Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! केस पडल्याच्या रागातून जावयाकडून सासूवर प्राणघातक हल्ला

677 0

पुणे : पुण्यातून (Pune Crime News) जावयाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पोटगी व मुलीचा ताबा मिळावा, यासाठी न्यायालयात सुरू असलेली केस सासू मागे घेत नाही, याचा राग मनात धरून जावयाने सासूवर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला आहे. ही धक्कादायक घटना हवेली तालुक्यातील नायगाव या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.

अलका विठ्ठल गवळी (50, रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली) असे जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. तर संग्राम बळवंत शिंदे (38, रा. शिंदे वस्ती, मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) असे आरोपी जावयाचे नाव आहे. याप्रकरणी रुपाली संग्राम शिंदे (28, सध्या रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली, मूळ रा. शिंदे वस्ती, रेल्वेलाइन जवळ, मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
फिर्यादी रुपाली शिंदे या त्यांच्या आई अलका गवळी यांच्यासोबत नायगाव येथे राहतात. रुपाली यांची पोटगी व मुलीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात केस सुरू आहे. आरोपी संग्राम शिंदे हा बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नायगाव येथील सासूच्या घरी आला. त्याने रुपाली यांना केस मागे घेण्यास सांगितले. यावर फिर्यादी रुपाली यांनी ‘जे काही होईल ते न्यायालयात होईल’ असे सांगितले. यामुळे चिडलेल्या संग्राम याने टीफीनच्या पिशवीतून आणलेला चाकू बाहेर काढत ‘तुला जिवानिशी सोडणार नाही’ असे म्हणत रुपाली यांच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी रुपाली यांची आई अलका गवळीमध्ये आल्या. ‘तुझ्यामुळेच सगळे होत आहे, तूच केस मिटवू देत नाहीस, तुलाच खल्लास करतो’ असे म्हणत संग्राम याने अलका गवळी यांच्या पोटात दोन ते तीन वेळा चाकू खुपसला. तसेच त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार केले. यामध्ये अलका गवळी या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमोल घोडके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Beed News : दोन्ही मुंडे कुटुंबीयांचं बीड जिल्ह्यातील नेमकं योगदान काय? राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल

Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

Kangana Ranaut : स्मृती इराणींच्या मासिक पाळीसंदर्भातील ‘त्या’ विधानावर कंगना रणौतनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Share This News

Related Post

Maharashtra Kesari 2023 : सिकंदर शेख ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी

Posted by - November 10, 2023 0
पुणे : कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात ६६व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम…
Ashish Bharti

Ashish Bharti : पुणे महानरपालिकेचे माजी आरोग्य प्रमुख आशिष भारती यांना सत्र न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - November 30, 2023 0
पुणे : पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती (Ashish Bharti), मेडिकल ऑफिसर डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश…
Pune News

Pune News : कात्रज उद्यानालयाच्या अनाथालयातून बिबट्या पळाला; मात्र…

Posted by - March 4, 2024 0
पुणे : कात्रज उद्यानांमधील अनाथालयात असणारा बिबट्या अनाथालयातून बाहेर पळाल्याची घटना कात्रज उद्यानामध्ये सोमवारी घडली. हि बातमी सोशल मीडियावर वारसारखी…

Saswad Municipality : सासवड नगरपालिका हद्दीमध्ये कचरा टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करावी – डॉ उदयकुमार जगताप

Posted by - September 18, 2023 0
पुणे : सासवड हद्दी मध्ये (Saswad Municipality) भोंगळे पेट्रोल पंप जवळ,धन्वंतरी हॉस्पिटल जवळ नागरिक कचरा टाकून शहर विद्रूप व अस्वच्छ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *