कात्रज गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणी चौघांना अटक

456 0

पुणे- पुणे शहरातील कात्रज परिसरात काल मंगळवारी एका अनधिकृत गॅस गोडाऊनला भीषण आग लागली होती. या ठिकाणी लागलेल्या आगीने 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले होते. या प्रकरणी गोडाऊन मालक आणि जागा मालकासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

या सिलिंडरच्या स्फोटांनी कात्रज परिसर हादरुन गेला होता. गोडाऊन मालक सागर संदीप पाटील, जागामालक दत्तात्रय काळे, सोनू मांगडे आणि संपत सावंत अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. या संदर्भात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून या ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा केला होता. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मधून लहान टाक्यात गॅस रिफिलिंग केला जात होता. काल मंगळवारी या ठिकाणी आग लागली. यामध्ये 20 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. यामध्ये स्थानिक नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. या आगीमध्ये फुटलेल्या अनेक गॅस सिलेंडरच्या टाक्या आजूबाजूचा घरावर पडून घराच्या काचा फुटल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पोलिस पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Lalit Patil

Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलची मासिक कमाई किती? धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - October 20, 2023 0
पुणे : देशातील विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयात दोन कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी माफिया ललित पाटील…

अश्विनी जगताप यांनी चिंचवडचा गड राखला; 36 हजाराच्या मताधिक्याने विजय !

Posted by - March 2, 2023 0
चिंचवड : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते ते चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या निकालाकडे… चिंचवड पोट निवडणुकीमध्ये 36…
dead

सोलापूर हादरलं ! आजीच्या डोळ्यासमोर 10 वर्षांच्या नातवाने सोडला जीव

Posted by - May 10, 2023 0
सोलापूर : सोलापूरमध्ये (Solapur) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सोलापूरातील लष्कर विभागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. शांताराज…
Murlidhar mohol

Murlidhar Mohol : उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार : मुरलीधर मोहोळ

Posted by - May 8, 2024 0
पुणे : शहरातील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग एमएसएमई आणि स्टार्टॲप्सच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *