Pune News

Pune News : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न

384 0

पुणे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे (Pune News) करतानाच त्याच्या दृश्य स्वरूपाची सावित्रीबाईंच्या काळात जसे असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. स्मारकासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहसंचालक राजेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश सूळ, महानगरपालिकेच्या अधीक्षक अभियंता हर्षदा शिंदे, कार्यकारी अभियंता सुनील मोहिते आदी उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा’ अशी वाटली पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदाकडून वेगवेगळे आराखडे तयार करुन घ्यावेत. आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, फर्निचर, क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्यापद्धतीचे दर्शनी भाग आदी बाबींचा विचार व्हावा. जागेचा विचार करता शाळेच्या इमारतीत उद्वाहकाची व्यवस्था करावी.

या परिसरात वाहनतळाची इतरत्र व्यवस्था करण्याच्यादृष्टीने चाचपणी करावी. स्पर्धात्मक युगाचा विचार करता या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्यादृष्टीने शाळेची रचना व आधुनिक अभ्यासक्रमाबाबत महानगरपालिकेने चाचपणी करावी. समितीने आराखडा अंतिम केल्यानंतर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे. स्मारक पूर्ण झाल्यानंतर अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे श्री. भुजबळ म्हणाले.

महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा यांना जोडणाऱ्या मार्गाचे आरक्षण नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. आरक्षण निश्चितीनंतर पुणे महानगरपालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करावी. यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी. नागरिकांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असेही श्री. भुजबळ म्हणाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. ढाकणे आणि संचालक श्री. पाटील यांनी कामाच्या अनुषंगाने बैठकीत माहिती दिली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IND vs SA : आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका पहिला टी- 20 सामना

Aadhaar Link Voter ID : आता वोटर कार्ड – आधार कार्ड लिंक करावं लागणार? सरकारकडून नवीन अपडेट जारी

Beed Crime : बीड हादरलं ! सख्ख्या भावानेच केला घात; ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Car Accident : दुर्दैवी! कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

Solapur News: खळबळजनक ! ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी फेसबुक पोस्ट करत पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

Share This News

Related Post

किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी (व्हिडिओ)

Posted by - February 5, 2022 0
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप केल्यानंतर सोमय्या राऊतांविरोधात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी शिवाजी नगर…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी

Posted by - March 24, 2022 0
पुणे- १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेच्या स्वच्छतागृहात अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार झाल्याच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून…

PUNE CRIME : सराईत गुन्हेगार योगेश नागपुरे आणि टोळक्यातील सहा साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - December 3, 2022 0
पुणे : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आत्तापर्यंत अनेक गुन्हेगार आणि टोळक्यांवर जबरदस्त कारवाईचा बडगा उभारला आहे. मुंडवा पोलीस स्टेशनच्या…
Pune Police video

आळंदीमध्ये नेमके काय घडले? पोलिसांनी शेअर केला प्रकरणाची दुसरी बाजू दाखवणारा व्हिडिओ

Posted by - June 12, 2023 0
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडला . या सोहळ्यात वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र…
loksabha

Loksabha Election : पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ लोकसभा मतदारसंघांवर असणार साऱ्यांचं लक्ष

Posted by - May 31, 2024 0
पुणे : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार असून मतमोजणी ही 4 जून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *