Bhandara Murder

Bhandara Murder : हातपाय बांधलेल्या अवस्थेत धरणात सापडलेल्या ‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश

594 0

भंडारा : काही दिवसांपूर्वी भंडाऱ्यामध्ये (Bhandara Murder) एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यामध्ये भंडारा येथील गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये नयन खोडके (वय 19) या तरुणाचा गुरुवारी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. पोलीस बरेच दिवस या प्रकरणाचा तपास करत होते. अखेर त्यांना या मृतदेहाचे गूढ उकलण्यात यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी घरी काही न सांगता बाहेर निघून गेलेल्या नयन खोडकेचा मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत वैनगंगा नदीच्या कोरंभी ते सालेबर्डी परिसरातील बॅक वॉटरमध्ये आढळला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्याच्या कुटुंबियांनादेखील मोठा धक्का बसला होता. ही हत्या भंडाऱ्यापासून काही अंतरावरील रमणीय स्थळ असलेल्या झिरी इथे करण्यात आली होती.

19 वर्षीय युवती प्रेयसीसोबत नयनचे प्रेम संबंध होते. परंतु काही दिवसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले आणि वाद होऊ लागले. अशातच वाद मिटविण्याच्या नावावर युवतीने नयनला झिरी येथे बोलावले, तिथे दोघांमध्ये वाद सुरू असताना मंथन आणि साहिल यांनी नयनची गळा आवळून हत्या केली. यानंतर मृतक नयन खोडके याला दुचाकीवर बसवून गोसीखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटरच्या पुलावर नेऊन त्याचे हातपाय बांधले आणि पुलावरून खाली फेकून दिले. या प्रकरणी आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला आहे. मंथन अशोक ठाकरे (वय 19, रा. भोजापूर), साहिल शरद धांडे (वय 19, रा. पेट्रोलपंप ठाणा) अशी आरोपींची नावे आहेत. भंडारा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

Mount Merapi Volcano : माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! येरवडा कारागृहाचे डॉक्टर संजय मरसाळे यांना पुणे गुन्हे शाखेकडून अटक

Share This News

Related Post

Crime News

Crime News : मैत्रीने केला घात ! चाकूच्या धाकाने आरोपींचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Posted by - December 16, 2023 0
अहमदनगर : अहमदनगरमधून एक मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना (Crime News) समोर आली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.…
Ambadas Danve

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

Posted by - April 14, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून एक मोठी बातमी (Maharashtra Politics) समोर आली आहे. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते…
Document News

Document News : कामाची बातमी ! ‘या’ एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून होणार नियम लागू

Posted by - September 14, 2023 0
येत्या एका ऑक्टोबरपासून देशान नवा नियम लागू होणार आहे. आपल्या प्रत्येकासाठी हा नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक ऑक्टोबरपासून जन्म…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वकालीन आदर्श राजे- उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - June 26, 2022 0
मुंबई दि. 26 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित,…

नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यावर कारवाई होणार का ? मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष

Posted by - March 22, 2022 0
मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यामध्ये वाद पेटला आहे. नारायण राणे यांच्या जुहू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *