Cucumber Benefits

Cucumber Benefits : हिवाळ्यात काकडी करेल तुमच्या त्वचेचे रक्षण

488 0

काकडी (Cucumber Benefits) ही फळभाजी अत्यंत पाणीदार असून, शरीराला हायड्रेट करण्याचे काम करत असते. थंडीमध्ये तुम्हाला काकडीमधील असणारे पोषक घटक, निरोगी आरोग्यासाठी प्रचंड मदत करू शकतात. काकडीच्या सेवनानंतर ताजेतवाने वाटते, त्याचसोबत शरीरदेखील हायड्रेट राहते. याव्यतिरिक्त काकडीचे अजून बरेच फायदे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया….
1) हायड्रेशन
हिवाळ्यामध्ये आपली त्वचा प्रचंड कोरडी पडत असते. अश्यावेळेस तिची काळजी घेणे हे खूप गरजेचे असते. त्यामुळे हिवाळ्यात काकडी तुमच्या शरीरास, त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करून थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घेते.

2) कमी कॅलरीजचा नाश्ता
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर काकडी खाणे हा सर्वात उत्तम पर्याय ठरेल. काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असून फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे अवेळी लागलेली भूक शांत होते आणि अतिरिक्त कॅलरीजदेखील वाढत नाहीत.

3) त्वचेसाठी गुणकारक
काकडीमध्ये असणारे ए आणि सी जीवनसत्वे तुमच्या त्वचेचे कॉलेजन वाढवण्यास मदत करून, त्वचेची लवचिकतादेखील वाढवण्यास मदत करते. काकडीमधील अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचेवर चमक येते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत करते.

4) डिटॉक्स
काकडीमुळे शरीरातील अनावश्यक घटक लघवीवाटे आपल्या शरीराबाहेर जाण्यास मदत होते. या डिटॉक्समुळे आपले पचन चांगले होते. तसेच वजन कमी होऊन आपली त्वचादेखील सुंदर ठेवण्यास मदत होते.

5) चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते
काकडीमध्ये असणाऱ्या मँगनीज आणि व्हिटॅमिन के मुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात काकडीचे सेवन केल्याने आपली चयापचय क्रिया चंगली राहते तसेच आपले वजनदेखील नियंत्रणात राहते.

(टीप : वरील सर्व माहिती टॉप न्यूज मराठी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.याबाबत टॉप न्यूज मराठी कोणताही दावा करत नाही.)

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Shrirampur News : एजंटकडून सही दिली नाही म्हणून RTO कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

Mumbai Airport : खळबळजनक ! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

Corona Scam : पुणे महापालिकेत कोविड घोटाळ्याप्रकरणी तात्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Goat Milk

Goat Milk : गाईच्या दुधापेक्षा जास्त फायदेशीर आहे बकरीचं दूध; जाणून घ्या फायदे

Posted by - August 1, 2023 0
आरोग्यासाठी अनेक जण गाईचं दूध पितात. पण तुम्हाला माहित आहे की गाई आणि म्हशीच्या दूधापेक्षा बकरीचं दूध (Goat Milk) आरोग्यासाठी…
Sirsasana

Sirsasana : शीर्षासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Posted by - March 30, 2024 0
खाली डोकं आणि वर पाय..योगसाधनेबद्दल आधी जो उल्लेख केला…त्या स्थितीतले, हटयोग प्रकारातले मुख्य, सुप्रसिद्ध आसन म्हणजेच ’शीर्षासन’ (Sirsasana).शीर्षासन हा संस्कृत शब्द असून…
Gyan Mudra

Memory : रागीट स्वभाव असेल तर ‘हा’ उपाय करून पहा; स्मरणशक्तीमध्ये होईल वाढ

Posted by - July 22, 2023 0
रागीट स्वभाव आणि स्मरणशक्तीचा (Memory) अभाव असणाऱ्या व्यक्तींना जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे दोष दूर करण्यासाठी ‘योगासन’ हा…

धक्कादायक ! मानवी रक्तात आढळून आले प्लास्टिकचे सूक्ष्म कण

Posted by - March 26, 2022 0
लंडन- दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, खेळणी, ‘यूज अँड थ्रो’ काटे-चमचे यातील प्लास्टिकचे बारीक कण मानवी रक्तात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *