transgender cricket player

ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी

456 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीने (ICC) ट्रान्सजेंडर खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ICC ने मंगळवारी ट्रान्सजेंडर खेळाडूंना आणि ज्यांनी लिंग बदल उपचार घेतले आहेत त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय खेळासाठी लिंग बदलाबाबत नवीन नियमांना आयसीसी बोर्डाने मान्यता दिल्यानंतर आता कोणताही पुरुष खेळाडू लिंग बदलून महिला क्रिकेट संघात खेळू शकणार नाही. 9 महिन्यांच्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

का घालण्यात आली बंदी?
आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, कोणत्याही पुरुष ते महिला खेळाडूला (ट्रान्सजेंडर महिला खेळाडू किंवा पुरुष लिंग बदलणारा पुरुष खेळाडू) जो कोणत्याही प्रकारच्या पुरुष यौवनातून गेला आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय महिला सामन्यांमध्ये भाग घेता येणार नाही. मग कोणत्याही शस्त्रक्रिया किंवा लिंग परिवर्तन उपचारांचा अवलंब केला असला तरीही. खेळाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी ICC ने ट्रान्सजेंडर क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. पीटर हार्कोर्ट यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी वैद्यकीय सल्लागार समितीने हा निर्णय घेतला आहे.

या नियमांचे दोन वर्षांत पुनरावलोकन केले जाईल. अशा परिस्थितीत, आता स्पष्टपणे सांगायचे तर, जे खेळाडू पूर्वी लिंग बदलून क्रिकेट संघाचा भाग बनले होते, ते आता असे करू शकणार नाहीत. आयसीसीच्या या नियमावर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आता आयसीसीच्या या नियमाचे काय परिणाम होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी

Auto Accident : भीषण अपघात! भरधाव शाळकरी रिक्षाची ट्रकला धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Ahmednagar News : अहमदनगर हादरलं ! पतीच्या विवाहबाह्य संबंधात पत्नीचा अडथळा; हत्येचा कट रचला आणि..

Bageshwar Baba : पुण्यात बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमस्थळी राडा; बाबाच्या स्वयंसेवकांची भक्ताला मारहाण

Share This News

Related Post

South Africa Team

World Cup 2023 : दक्षिण आफ्रिका संघाला लागली लॉटरी; थेट वनडे वर्ल्डकपसाठी ठरला पात्र

Posted by - May 10, 2023 0
मुंबई : दक्षिण आफ्रिका संघ यावर्षी भारतामध्ये खेळवल्या जाणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी (World Cup 2023) पात्र ठरला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023…

टेनिसपटू अंकिता रैना आणि पुनीत बालन ग्रुपमध्ये सामंजस्य करार.

Posted by - September 17, 2022 0
पुणे :  २०१६ च्या दक्षिण आशियाई टेनिस स्पर्धेत एकेरी व मिश्र दुहेरी अशा दोन्ही गटात सुवर्णपदक पटकावणाऱ्या अंकिता रैना व…
Asia Cup 2023

Asia Cup 2023 : भारतीय संघ जाहीर; आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : बीसीसीआयने नुकताच Asia Cup 2023 साठी भारताचा संघ जाहीर केला आहे. यामध्ये आयपीएल 2023 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या…

India vs England Semi-Finals : क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी; आजच्या सामन्यात खेळणारा ‘हा’ बॉलर जखमी

Posted by - November 10, 2022 0
India vs England Semi-Finals : आज सेमी फायनलमध्ये टीम इंडिया आणि टीम इंग्लंड यांच्यात लढत होणार आहे. आज दुपारी दीड…
Team India

Cricket World Cup : भारतीय क्रिकेट संघ 2024 मध्ये 3 वर्ल्डकप खेळणार

Posted by - December 31, 2023 0
मुंबई : यंदा 2023 साली भारतात खेळल्या गेलेल्या ICC एकदिवसीय वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवातून भारतीय चाहते अजूनही सावरले नाहीत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *