Kartiki Ekadashi 2023

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

2953 0

देवउठनी एकादशीला (Kartiki Ekadashi 2023) हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी देव जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो आणि हा शुभ कालखंडाचा प्रारंभ मानला जातो. यावर्षी देवउठनी एकादशी 23 नोव्हेंबरला होणार आहे. देवउठनी एकादशीला आपण कार्तिकी एकादशी म्हणतो. या एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशीविवाह पार पडतो. धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिकी एकादशीच्या दिवसापासून विश्वाचे नियंत्रक भगवान विष्णू आणि सर्व देव 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि आपापली कर्तव्ये स्वीकारतात. सर्व शुभ कार्ये देव उठल्यानंतरच होतात. चला तर मग आज देवउठनी एकादशीचा म्हणजेच कार्तिकी एकादशीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया….

कार्तिकी एकादशी तिथी आणि मुहूर्त
प्रबोधिनी एकादशी 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11.03 वाजता सुरू होईल आणि २३ नोव्हेंबर रोजी रात्री 09.01 वाजता समाप्त होईल. त्यामुळे गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी देवउठनी एकादशीचे व्रत केले जाणार आहे. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.00 ते 8.13 या वेळेत व्रत सोडणे शुभ राहील.

कार्तिकी एकादशीची पूजा कशी करावी ?
सर्व एकादशींप्रमाणे या एकादशीला पूजेची पद्धत सारखीच असली तरी काही घरांमध्ये या दिवशी तुळशी आणि शालीग्रामचे लग्न लावले जाते. या दिवशी घराच्या अंगणात भगवान विष्णूच्या चरणांचा आकार बनवावा आणि संध्याकाळी मुख्य दरवाज्यावर दोन्ही बाजूंनी दिवे लावावेत. त्यानंतर रात्री विष्णूसह देवी-देवतांची पूजा करावी. त्यानंतर शंख आणि घंटा वाजवून भगवान विष्णूंना उठवावे.

कार्तिकी एकादशीला असा असेल मंदिरातील कार्यक्रम
पहाटे 2 वाजून 10 मिनिटे ते 2 वाजून 20 मिनिटापर्यंत गाभारा व सोळखांबी स्वच्छता करण्यात येईल.
पहाटे 2 वाजून 20 मिनिटे ते 3 वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांच्या हस्ते विठ्ठल पूजा केली जाईल.
पहाटे 3 ते 3 वाजून 30 मिनिटापर्यंत उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची पूजा केली जाईल.
पहाटे 3 वाजून 5 मिनिटांनी देवाच्या पदस्पर्श रांगेची सुरुवात होईल.
पहाटे 3 वाजून 30 मिनिटे ते पहाटे 4 वाजून 30 मिनिटेपर्यंत 73 कोटीच्या मंदिर विकास आराखडा भूमिपूजन होईल.
भूमिपूजननंतर उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी यांचा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात येईल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ahmednagar News : अहमदनगर हादरलं ! पतीच्या विवाहबाह्य संबंधात पत्नीचा अडथळा; हत्येचा कट रचला आणि..

Bageshwar Baba : पुण्यात बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमस्थळी राडा; बाबाच्या स्वयंसेवकांची भक्ताला मारहाण

Drinking Alcohol : बिअर, वाईन, व्हिस्की की रम? कोणतं मद्य आहे शरीराला अधिक धोकादायक?

Pune Video : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत ! ग्राहकांच्या डोळ्यादेखत वाईन शॉप लुटले

Share This News

Related Post

रिक्षाचालक ते रिअल इस्टेट किंग; वाचा कसा आहे अविनाश भोसले यांचा प्रवास

Posted by - May 27, 2022 0
पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले  यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांना येस बँक आणि डीएचएफएल बँक गैरव्यवहार…
Lalbaugcha Raja

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या दर्शनामध्ये उसळली गर्दी; Video आला समोर

Posted by - September 21, 2023 0
मुंबई : ‘लालबागचा राजा’ हा (Lalbaugcha Raja) कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या 10 दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी…

अर्थकारण : Credit Score खराब झालाय ? सुधारण्यासाठी करा हे …

Posted by - September 7, 2022 0
कर्जासाठी बँकेत अर्ज केल्यानंतर बँक आपला क्रेडिट स्कोर तपासते. सर्व प्रकारच्या क्रेडिट इन्फॉरमेशन कंपन्या या क्रेडिट रिकॉर्डच्या आधारावर क्रेडिट स्कोर…

राऊत नहीं तो क्या हुआ ? उनके नाम की कुर्सी ही काफी है..!

Posted by - September 21, 2022 0
गोरेगावातील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा भरवण्यात आलाय. या मेळाव्यास देशभरातील गटप्रमुख आपली हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याच्या व्यासपीठावर ठेवण्यात…

भटकंती : “मोराची चिंचोली” आहे १ दिवसाच्या सहलीसाठी भन्नाट ठिकाण ; कसे पोहोचायचे,कुठे राहायचे,जेवण,मजामस्ती .. वाचा सविस्तर माहित

Posted by - November 12, 2022 0
पुणे : अहमदनगर रोडवर शिरूर जवळ मोराची चिंचोळी हे एक छान पर्यटन स्थळ आहे. या गावात मोरांचे वास्तव्य असल्याने याला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *