Maratha Reservation

Maratha Reservation : माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये; म्हणत मराठा आरक्षणासाठी 9 वीच्या विद्यार्थिनीने उचलले ‘हे’ पाऊल

616 0

नांदेड: सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच गाजताना दिसत आहे. एकीकडे आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना दुसरीकडे मात्र काही तरुण – तरुणी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. अशीच एक घटना नांदेडमधून समोर आली आहे. यामध्ये नववी वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने आरक्षणाची मागणी करत गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. कोमल बोकारे (14, रा. सोमेश्वर) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने एक चिठ्ठीदेखील लिहिली असल्याचे समोर आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
कोमल बोकारे ही नांदेड तालुक्यातील सोमेश्वर येथील रहिवासी आहे. तिचे वडील तुकाराम बोकारे हे अल्पभूधारक शेतकरी आहे. त्यांना पाच मुलगी असून कोमल ही दुसऱ्या नंबरची होती. गुरुवारी सकाळी 9.30 दरम्यान तिने दुसऱ्या मजल्यावरील रूममध्ये गळफास घेतला. ही बाब समजल्यानंतर कुटुंबियांनी तिला तात्काळ राहटी येथील खाजगी रुग्णालयात नेले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. अखेर गुरुवारी मध्यरात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावात साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला कोमल देखील बसायची. असं गावकऱ्यांनी सांगितले. मात्र तीने टोकाचं पाउल उचलल्याने सर्वाना धक्का बसला आहे. तसेच तिच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जो पर्यंत प्रशासन या घटनेची दखल घेत नाही तो पर्यंत मृतदेहावर अंतविधी करणार नसल्याची भूमिका गावाकऱ्यांनी घेतली होती.या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सुसाईट नोट आली समोर?
कोमल बोकारे हिच्या मृतदेहा जवळ चिठ्ठी कुटुंबियांना सापडली आहे. मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावं. माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये. आई अण्णा मला माफ करा असं कोमलने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हंटले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ind Vs Aus : मेगाफायनलला पावसाने घोळ घातल्यास विजेता कोण होणार? ICC चा नियम काय सांगतो?

Pune News: पुण्यात नामदेव जाधवांच्या तोंडाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ फासलं

Junnar Accident : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा जुन्नरमध्ये भीषण अपघात

Share This News

Related Post

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची आकर्षक पुष्पसजावट

Posted by - June 3, 2022 0
फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान गणरायाचे विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या…
Vishal Agrawal

Pune Accident : विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; ‘हे’ 2 नवीन कलम लावण्यात येणार

Posted by - May 24, 2024 0
पुणे : रविवारी पुण्यात मोठा अपघात (Pune Accident) घडला होता. अल्पवयीन मुलानं भरधाव पोर्शे कार चालवत दोन दुचाकीस्वारांना चिरडलं. या…
Jalna Suicide

‘तू मला अजिबात आवडत नाही’; पतीचे हे वाक्य जिव्हारी लागल्याने विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - June 14, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका 19 वर्षीय विवाहितेने राहत्या…

पतीला प्रेयसी सोबत राहायचे होते. म्हणून दोघांनी पत्नीचे हातपाय बांधून….

Posted by - April 28, 2023 0
आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला संपवण्यासाठी पतीने आणि त्याच्या प्रेयसीने पत्नीचे हातपाय बांधून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने…

चांदिवाल आयोगाची देशमुखांना क्लिनचिट ? 100 कोटींच्या वसुलीचे आरोप खोटे

Posted by - April 26, 2022 0
मुंबई – चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *