पुण्यात तृतीय पंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

540 0

पुणे- आंतरराष्ट्रीय तृतीय पंथील ओळख दिनानिमित्ताने तृतीय पंथीयांसाठी २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ या कालावधीत ‘तृतीय पंथीय मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात हा सप्ताह साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

जगभरात ३१ मार्च हा दिवस तृतीय पंथी ओळख दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं तृतीय पंथीयांची मतदार नोंदणी करताना त्यांच्याकडील कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने  त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. १८ ते २१ वर्षाच्या तृतीय पंथी नागरिकांकडे वयाचा पुरावा नसल्यास त्यांना गुरू माँ ने दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून  ग्राह्य धरण्यात येईल.

२१ वर्षावरील तृतीय पंथी व्यक्तीने स्वत:चे वय सांगणारे दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अधिकाधिक तृतीय पंथी व्यक्तींनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

Share This News

Related Post

कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करून महिलेवर बलात्कार, हिंजवडीमधील घटना

Posted by - May 24, 2022 0
पिंपरी- काहीतरी बोलण्याचे निमित्त सांगून महिलेला घरी आणले. तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध केले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही…
Ferguson College

Pune News : जोत्सना काळे विद्यार्थीनीने फर्ग्युसन कॉलेज विरुद्ध केलेल्या तक्रारीची सहाय्यक आयुक्तांनी घेतली दखल

Posted by - October 22, 2023 0
पुणे : जोत्सना काळे या विद्यार्थिनीने फर्ग्युसन काॅलेज मधून B.sc. चे शिक्षण पूर्ण केले आहे. जोत्सना काळे हीने मागासवर्गीय प्रवर्गातून…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावण्यात आलेलं नेमकं प्रकरण आहे तरी काय ?

Posted by - March 13, 2022 0
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस बजावली असून या नोटीसीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं…

नगर पुणे महामार्गावर जागेवर उभा असलेल्या कंटेनरला कारची जोरदार धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Posted by - February 22, 2023 0
पुणे : नगर पुणे महामार्गावर कारेगाव जवळ मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला कारने…

50 खोकी हा विषय केवळ रवी राणांच्या दिलगिरीचा नाही, 50 कोटी प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हावी : आम आदमी पार्टी

Posted by - October 31, 2022 0
आज बीजेपी आमदार रवी राणा यांनी माफी मागितली आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, या सरकारचे समर्थक आमदार बच्चू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *