दिव्यांगांसाठी खुशखबर, आता दिव्यांगही होऊ शकतात IPS, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

394 0

दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं एक मोठा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. दिव्यांगांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयपीएस, आरपीएफ आणि DANIPSमध्ये नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे दिव्यांग उमेदवार 1 एप्रिलला दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा अंतरिम आदेश पारित करून दिव्यांगांना भारतीय पोलिस सेवा, भारतीय रेल्वे संरक्षण दल सेवा आणि दिल्ली, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीप पोलिस सेवेत सेवा देण्याची परवानगी दिली. दिव्यांग उमेदवारांना सेवेत घेतले जाणार की नाही? हे अंतिम आदेशावर अवलंबून असेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती ए एम खानविलकर आणि न्यायमूर्ती अभय एस ओका यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी दिला आहे. या निर्णयाचे दिव्यांगांकडून स्वागत करण्यात येत आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दिव्यांग उमेदवार अर्ज करू शकतात. आता हे सगळं असलं तरी दिव्यांगांची निवड हो सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाववर अवलंबून असणार आहे. असंख्य दिव्यांग केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करतात. त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.

Share This News

Related Post

मग, मातोश्रीवर हल्ला करायचा होता; तेव्हा कळलं असतं… आ.दिलीप मोहिते यांचं वक्तव्य

Posted by - April 10, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर एस.टी कामगारांनी केलेल्या हल्ल्यांनंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान…
RASHIBHAVISHY

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज आहे ‘खास’ दिवस ! आत्तापर्यंत केलेले पुण्यंकर्म चांगले फळ देणार ; वाचा तुमचे राशी भविष्य

Posted by - January 19, 2023 0
मेष रास : आजचा दिवस तुम्ही कुटुंबासाठी व्यतित करणार आहात. तुमच्या मुलांकडून आज तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला…

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर

Posted by - November 23, 2022 0
मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक…

महाराष्ट्राची पर्यटनात बाजी ; सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कारामध्ये दुसरा क्रमांक महाराष्ट्राला

Posted by - September 27, 2022 0
पुणे : भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आज जागतिक पर्यटन दिनी उपराष्ट्रपती जगदीप धानकर यांच्या हस्ते २०१८-१९ या वर्षासाठीच्या राष्ट्रीय पर्यटन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *