Satara Crime

Satara Crime : पाटण- पंढरपूर मार्गावर आढळला मृतदेह

879 0

सातारा : पाटण- पंढरपूर राज्यमार्गावर (Satara Crime) चरेगाव (ता.कराड) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, सदरचा अपघात रात्रीच्या सुमारास झाला असून धडक दिलेल्या वाहनधारकाने सदर व्यक्तीस उचलून रस्ताकडेला ठेवले अशी चर्चा सगळीकडे सुरु झाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.सविस्तर माहिती अशी कि, चरेगाव (ता. कराड) येथे सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मागासवर्गीय वस्तीमधील आनंदा बापू कांबळे (सुतार) हे नेहमीप्रमाणे रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी पवार मळा रोड येथे गेले होते. त्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी फिरायला गेलेल्या ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आला.

या घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय कराड येथे पाठवला आहे. उंब्रज पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Love Jihad

Love Jihad : वांद्रे टर्मिनस येथे लव्ह जिहादच्या आरोपाखाली तरुणाला मारहाण

Posted by - August 16, 2023 0
मुंबई : वांद्रे टर्मिनस येथे तरुणीसोबत बाहेर गेलेल्या तरुणाला लव्ह जिहादच्या (Love Jihad) आरोपाखाली मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा…

#CRIME NEWS : हैदराबाद मधून पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देण्याचा धमकीचा फोन; विक्षिप्तपणाचा कळस !

Posted by - February 13, 2023 0
पुणे : पुण्यातील गुगलचे ऑफिस बॉम्बने उडून देण्याच्या धमकीच्या फोन नंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल…
Jammu and Kashmir

Jammu and Kashmir: उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2 दशतवाद्यांना कंठस्थान

Posted by - April 5, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वत्रिक निवडणुकांचे वातावरण असताना जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 2…
Chandrapur Crime

‘त्या’ चुकीमुळे चक्क एका कैद्याने पोलिसाला केली बेदम मारहाण (Video)

Posted by - May 22, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये (Chandrapur) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये एका आरोपीने…

पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; पाहा कोणते आहेत भाग ?

Posted by - May 23, 2022 0
देखभाल आणि दुरुस्तीच्या कारणास्तव पुण्यातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद करण्यात येणार आहे. पुण्यातील विविध भागांत हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *