Govindbagh

Pune News : पवार समर्थकांनी गोविंदबाग फुलली; शरद पवार, सुप्रिया सुळेंनी कार्यकर्त्यांकडून स्वीकारल्या दिवाळीच्या शुभेच्छा

4177 0

पुणे : देशभरात अनेक मान्यवर कुटुंबीय आपापल्या पद्धतीने दिवाळी पाडवा सण साजरा करतात. मात्र बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबीयांकडून साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा सण वैशिष्ट्यपूर्ण असतो.पवार कुटुंबातील अनेक सदस्य देश विदेशात वास्तव्यास आहेत. या सर्वांची एकत्रित भेट व्हावी, काही दिवस एकत्रित घालविण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळीनिमित्त एकत्रित येत पाडव्यासह दिवाळी सण मोठ्या आनंद उत्सवात साजरा करतात.

दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय नागरिकांना भेटत असतात. तसेच शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी व दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय, कलाक्रीडा, आधी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह अनेक जण गोविंदबागेत दाखल होत असतात. अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे. सध्या या ठिकाणी संपूर्ण पवार कुटूंबीय हजर आहेत.

सध्या राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडत सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे आता आजच्या कार्यक्रमाला अजित पवार हजर राहतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

कोयता गँगविरोधात पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार अँक्शन मोडवर; दिले ‘हे’ मोठे आदेश

Posted by - January 6, 2023 0
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांत कोयते घेऊन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात…
eknath shinde

Cabinet Meeting : दिवाळीनंतर पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला…

“रमेश लटके यांना मानसिक त्रास सुरू होता; मातोश्रीवर फोन देखील उचलण्यात येत नव्हते; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल …

Posted by - October 14, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक आता उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची मानली जाते आहे. दरम्यान रमेश लटके…

पुनीत बालन ग्रुपच्या शिवांश त्यागीला राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

Posted by - September 16, 2022 0
पुणे: नाशिक येथे पीस तायक्वांदो अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात दमदार कामगिरी बजावताना…
Flight Cancelled

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Posted by - December 29, 2023 0
पुणे : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, लखनौ, हैदराबाद, अमृतसर, गोवा या ठिकाणी जाणारी 14 विमाने रद्द (Flight Cancelled) करण्यात आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *