Palghar Accident

Palghar Accident : दिवाळीला लेकरांसोबत फटाके फोडायचं राहूनच गेलं; पालघरमध्ये मजुरांच्या गाडीचा भीषण अपघात

1987 0

पालघर : शुक्रवारपासून देशभरात दिवाळीला सुरुवात झाली आहे.त्यामुळे अनेक लोक दिवाळीसाठी आपल्या घराकडे जाताना दिसत आहेत. परिणामी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसत आहे. त्यामुळे अपघातदेखील वाढताना दिसत आहेत. असाच एक अपघात कासा डहाणू राज्यमार्गावरील वधना येथे घडला आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ऐन सणासुदीत ही घटना घडल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कसा घडला अपघात?
कासा डहाणू राज्यमार्गावरील वधना येथे दुपारच्या सुमारास खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक आणि पीकअप वाहनात समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर सहाजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही भरधाव वाहनांवरील चालकांचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.

या अपघातात दोन्ही वाहनांचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून जखमी झालेल्या सहा ते सात जणांवर कासा उपजिल्हा रुग्णालय तसच डहाणू ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दोन्ही खाजगी वाहनांमध्ये प्रवास करणारे प्रवासी हे मजूर असून ते दिवाळीनिमित्त घरी परतत असताना हा अपघात झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

पुणे : जागतिक मानसिक आरोग्य दिवस जनजागृतीसाठी पदयात्रा

Posted by - October 6, 2022 0
पुणे : मानसिक आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी गरजेचे आहे. जसे शारीरिकरीत्या तंदुरुस्त असणे गरजेचे असते तसेच मानसिकरित्याही फिट…

महापालिकेत आजपासून ‘प्रशासकराज ‘ नगरसेवकांचा कार्यकाळ संपुष्टात

Posted by - March 15, 2022 0
पुणे महानगरपालिकेचा कालावधी काल (ता.14 मार्च) रोजी संपली असून आता महापालिकेत प्रशासक राजवट असणार  आहे. नगरसेवकांचा पाच वर्षाचा कालावधी संपल्याने…

प्रसिद्ध एकपात्री कलाकार वंदन नगरकर यांचे निधन

Posted by - March 22, 2023 0
पुणे : प्रसिद्ध एकपात्री कलाकार आणि व्यक्तिमत्व विकास तज्ञ वंदन नगरकर यांचे मंगळवारी निधन झाले फुफुसांच्या कर्करोगाने ते त्रस्त होते…

… तर आम्ही सत्तेतून बाहेर पडणार; आमदार संजय शिरसाट यांचं मोठं विधान

Posted by - April 18, 2023 0
अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे याच पार्श्वभूमीवर संजय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *