Farmers

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड ! राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

726 0

मुंबई : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पीकविमा अग्रिम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. याचा लाभ राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे 35 लाख 08 हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. या विमा रक्कमा संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास संबंधित विमा कंपन्यांनी सुरुवात केली असल्याने बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

खरीप हंगामात वेगवेगळ्या जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीकविमा योजनेमध्ये राज्यातील तब्बल 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे. अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीकविमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25% अग्रीम पीकविमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्य स्तरावर अपील केलेले होते. अपिलांच्या सुनावण्या जसजशा होत गेल्या त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यानी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पीकविमा मंजूर?
नाशिक – शेतकरी लाभार्थी – 3 लाख 50 हजार (रक्कम – 155.74 कोटी)
जळगाव – 16,921 (रक्कम – 4 कोटी 88 लाख)
अहमदनगर – 2,31,831 (रक्कम – 160 कोटी 28 लाख)
सोलापूर – 1,82,534 (रक्कम – 111 कोटी 41 लाख)
सातारा – 40,406 (रक्कम – 6 कोटी 74 लाख)
सांगली – 98,372 (रक्कम – 22 कोटी 4 लाख)
बीड – 7,70,574 (रक्कम – 241 कोटी 21 लाख)
बुलडाणा – 36,358 (रक्कम – 18 कोटी 39 लाख)
धाराशिव – 4,98,720 (रक्कम – 218 कोटी 85 लाख)
अकोला – 1,77,253 (रक्कम – 97 कोटी 29 लाख)
कोल्हापूर – 228 (रक्कम – 13 लाख)
जालना – 3,70,625 (रक्कम – 160 कोटी 48 लाख)
परभणी – 4,41,970 (रक्कम – 206 कोटी 11 लाख)
नागपूर – 63,422 (रक्कम – 52 कोटी 21 लाख)
लातूर – 2,19,535 (रक्कम – 244 कोटी 87 लाख)
अमरावती – 10,265 (रक्कम – 8 लाख)
एकूण – लाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303 (मंजूर रक्कम – 1700 कोटी 73 लाख)

Share This News

Related Post

आज पासून बदलते आहे या चार राशींचे भाग्य; होणार महत्त्वपूर्ण आणि हितकारक बदल

Posted by - November 11, 2022 0
आज म्हणजेच शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रहाचे भ्रमण होते आहे. शुक्राचं संक्रमण झाल्यानंतर तो वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार…

ईडी ची टायपिंग मिस्टेक ; 5 चे केले 55 लाख

Posted by - March 4, 2022 0
मनी लॉण्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना गेल्या आठवड्यात अटक केली. त्यावेळी मलिक…
jayant Patil

शरद पवारांचा राजीनामा कायम राहावा यासाठी…; जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Posted by - May 6, 2023 0
सांगली : मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष…
Narendra Modi

PM Modi : हिमाचलमधील लेपचा येथे पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत दिवाळी केली साजरी

Posted by - November 12, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठ वर्षांप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारतीय लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी…

#PUNE : लोककला पथकांद्वारे शासनाच्या योजनांविषयी जनजागृती

Posted by - March 20, 2023 0
पुणे : जिल्हा माहिती कार्यालय पुणेच्यावतीने व जिल्हा नियोजन समितीच्या सौजन्याने लोककला पथकांच्या माध्यमातून अनुसूचित जाती उपयोजनाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *