मुनावळे येथील पर्यटनस्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

1142 0

सातारा दि. ५ – जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावातील स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज नियोजित मुनावळे पर्यटनस्थळाच्या जागेची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुनावळे पर्यटनस्थळाचा स्थानिकांनी आर्थिक उन्नतीसाठी वापर करावा, हे पर्यटन स्थळ विकसित करताना स्थानिकांना त्यामध्ये सामावून घ्यावे. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोऱ्यात आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, त्यातून स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळणार आहे. याचा फायदा स्थानिक व येणाऱ्या पर्यटकांनाही होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यासह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत. हे सर्व करताना सुरक्षेचा संपूर्ण विचार करण्यात आला आहे. निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम आदी सोयीदेखील याठिकाणी करण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मासेमारीसाठी स्थानिकांना परवानगी देण्यात यावी, जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. अतिरिक्त भू संपादन झालेल्या जमिनींचा प्रश्न जिल्हाधिकारी यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून वासोटा किल्ला, नागेश्वर मंदिर, अहिरे पुल, बामणोली परिसराची हवाई पाहणी केली.

Share This News

Related Post

एकनाथ शिंदे गट गुवाहटीतून गोव्याच्या दिशेने निघाला, उद्या मुंबईत दाखल होणार!

Posted by - June 29, 2022 0
गुवाहाटी- महाराष्ट्रातील सत्ता नाट्याचा केंद्रबिंदू असलेल्या एकनाथ शिंदे गटाने गुवाहाटी मधून आपला मुक्काम हलवला असून ते आता गोव्याला जाण्यासाठी निघाले…

सोशल मीडियाच्या युगात संयम आणि सहनशीलतेचा अंत – धनंजय चंद्रचूड

Posted by - March 5, 2023 0
समाजमाध्यमांवरील खोटय़ा बातम्यांच्या युगात सत्याचा बळी गेला आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमतरता असलेल्या युगात आपण राहात आहोत, असे मत सरन्यायाधीश…

ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या दुकानांमधून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Posted by - April 4, 2022 0
पुणे – ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
Crime

येरवडा जेलमध्ये जोरदार हाणामारी, दोघा आरोपींना बेदम मारहाण

Posted by - April 3, 2023 0
पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक २च्या जवळील…

6 डिसेंबरचा सूर्योदय आणि निळ्या सूर्याचा अस्त! डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

Posted by - December 6, 2022 0
6 डिसेंबर 1956… या दिवसाची सकाळ उजाडली ती निळ्या सूर्याच्या अस्तानं ! महामानव, भारतरत्न, बोधिसत्व आणि दलित-शोषितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *