ST Bus

ऐन दिवाळीत होणार प्रवाशांचे हाल; उद्यापासून एसटी कर्मचारी संपावर

1205 0

 

ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने 6 नोव्हेंबरपासून संपाची हाक दिली आहे.

या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सुर्फ संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली.

या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे.

सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. या संपात 68 हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Share This News

Related Post

Supriya And Sunetra

Supriya Sule : सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीवर सुप्रिया सुळेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - March 9, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणूक (Supriya Sule) जसजशी जवळ येत आहे, तसतशी उत्सुकता वाढत आहे. यावेळी सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे,…

Parenting Tips : मुलांच्या रागावर नियंत्रण ठेवायचं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स

Posted by - March 16, 2023 0
Parenting Tips : मुले मनाशी प्रामाणिक आणि हृदयाने अत्यंत भावनिक असतात. मात्र इच्छा पूर्ण न झाल्यास मुलांच्या चेहऱ्यावर राग दिसू…

महाराष्ट्र केसरी वादाच्या भोवऱ्यात; महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

Posted by - November 3, 2022 0
वर्धा : कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार बाळासाहेब लांडगे यांना नाही. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र…

लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्यावर बंदी घालण्यात यावी ; प्रशांत सदामते यांची मागणी

Posted by - December 22, 2022 0
लावणी नर्तीका गौतमी पाटील हीच्या अश्लिल कार्यक्रमुळे महाराष्ट्रात कायमस्वरुपी बंदी घालण्यात यावी आणि मिरज तालुक्यातील बेडग येथील दत्तात्रय ओमासे यांच्या…

 अजरामर गाण्यांमुळे लतादीदी सदैव आपल्यासोबत असतील

Posted by - February 6, 2022 0
संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने अनेक दशके मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *