Hardik Pandya

Hardik Pandya : भारताला मोठा धक्का! हार्दिक पंड्या उर्वरित वर्ल्डकपमधून बाहेर; ‘या’ खेळाडूची होणार संघात एंट्री

977 0

मुंबई : भारतीय संघ उद्या म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. मात्र या सामन्याअगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) हा दुखापतीमुळे उर्वरित वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. भारतासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

19 ऑक्टोबर रोजी पुण्यात झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये हार्दिक पंड्या जखमी झाला. बांगलादेशविरोधातील सामन्यात आपल्याच गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण करताना हार्दिक पांड्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यानंतर हार्दिक पांड्यावर उपचार सुरु करण्यात आले. तो साखळी फेरीमधील सामने खेळणार नाही असं आधी सांगण्यात आलं होतं. मात्र आज तो संपूर्ण स्पर्धेमधूनच बाहेर पडला असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. हार्दिक पांड्या बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी नवीन खेळाडू जाहीर करण्यात आला आहे.

‘हा’ खेळाडू घेणार हार्दिक पांड्याची जागा
हार्दिक पांड्या जखमी झाल्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. याअगोदरच भारताने हार्दिक पांड्याशिवाय खेळण्याची मानसिक तयारी ठेवली होती. 2 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे मैदानात झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधीच भारताचा कर्णधार रोहित शर्माने यासंदर्भातील संकेत दिले होते. त्यामुळे आता हार्दिकची जागा घेणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला प्रत्येक प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Share This News

Related Post

Mumbai Airport Shut

Mumbai Airport Shut : मोठी बातमी! मुंबई विमानतळ 6 तासांसाठी राहणार बंद

Posted by - October 16, 2023 0
मुंबई : मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport Shut) प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय…
Team India

India VS Ireland Series : आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात महाराष्ट्राच्या ‘या’ दोन खेळाडूंना मिळाली संधी

Posted by - August 18, 2023 0
आज टीम इंडिया आणि आयर्लंड (India VS Ireland Series) यांच्यात पहिला टी-20 सामना खेळवला जाणार आहे. आजच्या सामन्यात (India VS…
Ajit Pawar

NCP MLA disqualification case : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच ! अजित पवारांचे 41 आमदार पात्र

Posted by - February 15, 2024 0
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी पक्षासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा (Ajit…
Garba

Navratri 2023 : नवरात्रौत्सवसाठी राज्य सरकारच्या नव्या गाइडलाइन जारी

Posted by - October 12, 2023 0
मुंबई : मुंबईसह राज्यभरात नवरात्री (Navratri 2023) मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते.…
IPL 2024

IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?

Posted by - February 29, 2024 0
इंडियन प्रीमिअर लीग या टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या सीझनला 22 मार्चपासून (IPL 2024) सुरूवात होणार आहे. या सीझनसाठी डिसेंबर महिन्यामध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *