Atul Bedekar

Atul Bedekar : व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

1374 0

मुंबई : व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर (Atul Bedekar) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 56 वर्षांचे होते. बेडेकर हे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे. यामुळे उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

1910 साली विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसं किराणामालाचं दुकान सुरू केलं. त्याच दुकानात त्यांनी मसाले आणि लोणची ठेवण्यास सुरूवात केली. मसाले लोणची यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर दुकानांच्या शाखा काढायला सुरूवात केली. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर 1943 मध्येच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ असं कंपनीचं नामकरण करण्यात आले. कालांतराने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आणि बेडेकर मसाले हा एक मोठा ब्रँड तयार झाला.

फक्त देशात नाही तर ज्या ज्या देशात मराठी माणूस पोहचला तिथे तिथे अ बेडेकर उत्पादनंही पोहचली. 1960 साली भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या. आणि मग लोणचं निर्यात होऊ लागलं.कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास 600 टन लोणचं सीझनला बनतं.महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये याची विक्री केली जाते. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्येदेखील हा ब्रँड पोहोचला आहे.

Share This News

Related Post

पुण्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटीबद्ध– उपमुख्यमंत्री अजित पवार

Posted by - March 13, 2022 0
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील विविध भागात पायाभूत सुविधा निर्माण करुन नागरिकांना उत्तम सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात…

BEAUTY TIPS : नख वाढत नाहीत.. वाढल्यावर सहज तुटतात.. नखांच्या आरोग्यासाठी करा हे सोपे उपाय !

Posted by - December 21, 2022 0
BEAUTY TIPS : प्रत्येक तरुणीच तिच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष असतं हात आणि पायाची नको ही मोठी सुंदर दिसावी यासाठी आज…

संजय राऊत यांचे आईस भावनिक पत्र ! “…या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून दूर आहे…!”

Posted by - October 12, 2022 0
मुंबई : गेली दोन महिने ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे न्यायालयीन कोठडीत आहेत. चौकशी न्यायालयीन कोठडी सुनावणी यामध्ये अडकलेले…

महाराष्ट्र केसरीच्या पंचाना धमकावणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

Posted by - January 16, 2023 0
10 ते 14 जानेवारी दरम्यान पुण्यात 65 वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेनंतर एक मोठी बातमी समोर येते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *