21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोलबॉल चा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश

1012 0

अथक परिश्रम आणि ध्येयप्रतीची निष्ठा यामुळेच आज तब्ब्ल 21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रोलबॉल चा समावेश राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत झाला असून आता महाराष्ट्राच्या संघाने मुलांच्या आणि मुलींच्या अश्या दोन्ही विभागात सुवर्णपदक जिंकावे अश्या शुभेच्छा महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी दिल्या.

गोवा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरु असून उद्यापासून त्यात देशातील 8 सर्वोत्तम संघांमध्ये सुवर्णपदकांसाठी लढत होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या मुलं आणि मुलींच्या संघाला आज बालेवाडी स्टेडियम येथे निरोप देण्यात आला यावेळी ते बोलत होते.

रोलबॉल चा जन्म पुण्यात झाला, ह्या महाराष्ट्राच्या मातीतील राजू दाभाडे ह्या सामान्य कुटुंबातील मुलगा ह्या खेळाचा जनक. आज हा खेळ 57 देशात खेळला जात असून भारतात देखील जवळपास सर्वच राज्यात हा खेळ खेळला जातो.

आज सराव शिबिराच्या समारोप प्रसंगी राज्याचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, सरचिटणीस प्रताप पगार, व्यवस्थापक दादासाहेब भोरे, मार्गदर्शक अमित पाटील, संजय कोल्हे, हेमंगिनी काळे,ऐश्वर्या मदाने, आनंद पटेकर उपस्थित होते. यावेळी दोन्ही संघांना स्पर्धा जर्सी भेट देण्यात आल्या व यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणत्याही खेळात संघभावना महत्वाची असून संघ विजयी व्हावा यासाठी सर्व खेळाडू प्रयत्न करतील व व्यक्तिगत विक्रमांपेक्षा सांघिक भावनेला महत्व देतील अशी अपेक्षा ही संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली.

Share This News

Related Post

‘कुत्र्यांचे लाड घरी करा, गादीवर झोपवा’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुणाला झापले? वाचा..

Posted by - February 26, 2022 0
पुणे- अजित पवार कधी कुणाला चिंता काढतील ? कधी कुणाला टोमणे मारतील किंवा कधी कुणाला झोपतील हे कुणाला सांगता येत…

#CHANDRAKANT PATIL : ” दादा, पुण्यातील विक्रम – वेताळ खेळ थांबवा !” आम आदमी पार्टीचे पालकमंत्र्यांना पत्रं !

Posted by - March 23, 2023 0
पुण्यात चाललेला ‘विक्रम- वेताळ’ हा खेळ बघितल्यावर कोथरुड, बावधन, पाषाण, बाणेर येथील सुज्ञ रहिवाशांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की,…

पाऊसाचा हाहाकार; अग्निशमन दलाकडून 12 जणांची सुखरुप सुटका

Posted by - October 18, 2022 0
पुणे – काल राञी शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला असता विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण…

पाटस टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसूली; 4 जणांवर गुन्हा दाखल

Posted by - July 9, 2022 0
पाटस येथील टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून नियमबाह्य टोल वसूल करून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मॅनेजरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *