Ajit Pawar

Ajit Pawar : मराठा आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजितदादांनी माळेगाव कारखान्याचा कार्यक्रम केला रद्द

299 0

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. मात्र मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या कार्यक्रमाला कोणत्याही राजकीय व्यक्तीने उपस्थित राहण्यावर मराठा समाजाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यानुसार आज कारखाना परिसरात आंदोलक एकवटले आहेत या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेत हा नियोजित दौरा रद्द केला आहे.

कारखाना परिसरातील शेतकरी पुतळ्याजवळ आंदोलक एकवटले असून आरक्षणाच्या समर्थनात घोषणाबाजी सुरू आहे. ‘जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है… एक मराठा लाख मराठा.. ‘आरक्षणाच्या आमच्या हक्काचे. ‘नाही कुणाच्या बापाच.. एक मिशन मराठा आरक्षण..’ या मजकुराचे फलक घेऊन मराठा आंदोलक आंदोलन स्थळी जोरदार घोषणाबाजी करत आहे. यामुळे कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला येणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र कार्यक्रमास्थळी मराठा समाजाकडून आंदोलन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कारखान्यातील सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे समजत आहे.

Share This News

Related Post

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या द्वितीय स्मृतीदिनी ; लोकजनशक्ती पार्टीकडून अभिवादन

Posted by - October 8, 2022 0
पुणे : लोकजनशक्ती पार्टी पुणे शहर,जिल्हा मध्यवर्ती कार्यालय (साधू वासवानी चौक) येथे पक्षाचे संस्थापक पद्मभूषण स्व. रामविलास पासवान यांच्या द्वितीय…

राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला ; मंत्रिमंडळ विस्तारासह ,अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्या – अजित पवार

Posted by - August 2, 2022 0
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे याप्रसंगी अजित…
NCP

NCP : …तोपर्यंत ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ नाव कायम राहणार; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

Posted by - February 19, 2024 0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला, यानंतर शरद पवार गटाला…
Pm Post

‘हा’ असेल विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा; राऊतांनी थेट सांगूनच टाकलं !

Posted by - June 2, 2023 0
मुंबई : लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections0 अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे विरोधकांनी एकजूट व्हयला सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *