Satara Crime

Satara Crime : साताऱ्यातील बहुचर्चित ‘त्या’ खून प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश; 4 जणांना अटक

537 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara Crime) काही महिन्यापूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एका एजंटचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची समोर आली होती. याप्रकरणी बुधवारी रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले आहे. तसंच ताब्यात घेतलेल्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

काय घडले होते नेमके?
संशयित शिवाजी शिंदे याचे संदीप संकपाळ यांच्याबरोबर जमीन विक्री कमीशनवरुन वाद झाला होता. यातून चिडून संदीप संकपाळ यांना 21 ऑगस्ट 2023 रोजी साताऱ्यातील पोवई नाक्यावरु बोलावुन संशयितांनी अज्ञात स्थळी नेलं होतं. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी दोनच्या सुमारास संकपाळ यांचा गळा आवळून खून करण्यात आला.

यानंतर आरोपींनी संशय येऊ नये म्हणून खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी संदीप संकपाळ यांचा मृतदेह पाडेगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीतील ओढाजवळ पुरून ठेवण्यात आला होता. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली असून पोलिस पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News

Related Post

गुप्तधनाच्या हव्यासापायी गमावले जीव ! म्हैसाळमधील ९ जणांच्या हत्याकांडाचे पोलिसांनी उलगडले गूढ

Posted by - June 28, 2022 0
सांगली- म्हैसाळ सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी…
Raigad News

Raigad News : खळबळजनक !1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डेटोनेटर जप्त

Posted by - December 24, 2023 0
रायगड : रायगड जिल्ह्यातून (Raigad News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पोलिसांनी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त…

कांडका पडला! राजाराम सहकारी साखर कारखान्यात महाडिक गटाची दमदार एन्ट्री

Posted by - April 25, 2023 0
कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झाले आहेत. त्यांनी विरोधी सतेज…
Akola Accident

Akola Accident : आमदार किरण सरनाईकांच्या कुटुंबाचा भीषण अपघात: 6 जणांचा मृत्यू

Posted by - May 3, 2024 0
अकोला : अकोला (Akola Accident) जिल्ह्यातील पातूर घाटातील नवीन बायपासवरील नानासाहेब मंदिरसमोर 2 कारची सामोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.…
Accident News

Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Posted by - July 18, 2023 0
मुंबई : राज्यात अपघाताचे प्रमाण (Accident News) काही कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *