Pune News

Pune News : खळबळजनक ! पुण्यात मायलेकींचे संशयास्पद स्थितीत आढळले मृतदेह

1985 0

पुणे : इंदापूर तालुक्यातील (Pune News) हगारेवाडी येथे मायलेकींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरात दोघी मृतावस्थेत आढळल्या आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अश्विनी सागर म्हस्के (वय 28)वर्ष व सानवी सागर म्हस्के (वय 4) वर्षी अशी मृतांची नावे आहेत.आज शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास या दोघींचे मृतदेह राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे आढळून आले. शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघींचे मृतदेह खाली उतरवले. मात्र, ही आत्महत्या आहे कि हत्या याचा तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.

या प्रकरणी वालचंदनगर पोलीसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या त्याच्यावर संशय असून त्याला ताब्यात घेऊन जात असताना संतप्त नातेवाईकांना सागर म्हस्के याला चांगलाच चोप दिला. यानंतर पोलिसांनी कशीबशी त्याची जमावाकडून सुटका करुन त्याला पोलीस ठाण्यात नेले. माय-लेकीच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने हगारेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या हत्येप्रकरणी जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांकडून घेण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Heavy Rain

Weather Update: राज्यात आजही कोसळणार पाऊस; ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह वादळाचा इशारा

Posted by - November 30, 2023 0
पुणे : हवामान खात्यानुसार (Weather Update) राज्यात अनेक ठिकाणी आजही पाऊस कोसळणार आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात…

पुणे : महापौर हा शब्द कसा आला माहित आहे का ? आजही फक्त महाराष्ट्रात ‘मेअर’ ऐवजी वापरला जातो ‘महापौर’ हा शब्द ! असा आहे रंजक इतिहास…

Posted by - January 19, 2023 0
तुम्ही कधी हा विचार केलाय का ? की संपूर्ण भारतामध्ये ‘मेयर’ हा शब्द वापरला जात असताना आपल्या महाराष्ट्रामध्येच ‘महापौर’ हा…

हॉटेल, पोलिसांवर कारवाई झाली, जेसीबीही चालला पण पार्ट्या आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांवर कारवाई कधी ?

Posted by - June 25, 2024 0
पुण्यातील एल थ्री बार मधील पहाटेपर्यंत चाललेली पार्टी आणि वॉशरूम मध्ये ड्रग्स घेणारी मुलं यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झोपलेले प्रशासन…
Cyrus Poonawalla

Cyrus Poonawalla : सायरस पुनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका

Posted by - November 17, 2023 0
पुणे : उद्योगपती आणि सीरम इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात…

बसमध्ये झाली मैत्री; पुस्तक खरेदीच्या बाहण्याने पोहोचले पुण्यात; आरोपीने कोल्ड्रिंक मधून गुंगीचे औषध पाजून अत्याचार केला, तरुणीची 16 लाखाची फसवणूक

Posted by - March 1, 2023 0
पुणे : पुण्यात रोजच अत्याचार, बलात्कार फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *