Hardik Pandya

Hardik Pandya : भारतीय संघाला मोठा धक्का ! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यामधून हार्दिक पांड्या बाहेर

771 0

पुणे : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकला दुखापत झाली, त्यानंतर त्याला मैदानातून बाहेर जावे लागले होते. हार्दिक पांड्या हा संघासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याची अनुपस्थिती आता हा संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

“हार्दिक पांड्या 22 ऑक्टोबरला धर्मशाला येथे होणार्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या भारताच्या पुढील सामन्याला मुकणार आहे. पांड्याला बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नेण्यात येईल, जिथे त्याच्यावर इंग्लंडमधील तज्ञ डॉक्टर उपचार करतील आणि शक्यतो त्याला इंजेक्शन दिले जातील. पांड्या लखनौमध्ये भारतीय संघात सामील होण्याची अपेक्षा आहे आणि संघाला आशा आहे की तो इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.”

विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून हार्दिक पांड्याला वगळणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हार्दिक सध्या फॉर्ममध्ये आहे आणि तो संघासाठी बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. टीम इंडियाला वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडकडून नेहमीच खडतर स्पर्धेला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बाहेर पडणे हे टीमसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे भारतीय फॅन्स हार्दिक पांड्या लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.

Share This News

Related Post

Rashmi Shukla : फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांना क्लीन चिट

Posted by - September 8, 2023 0
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाकडून रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध…
Pune News

Pune News : मालपाणी ग्रुपचे शिक्षण क्षेत्रात नवे पाऊल ! शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणा-या तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्यासाठी ध्रुव ग्लोबल स्कूल सज्ज

Posted by - May 9, 2024 0
पुणे : तंत्रज्ञानाच्या सजग उपयोगाने शिक्षण सरळ, सुगम आणि रूचीपूर्ण होते. हे सूत्र लक्षात ठेऊन ध्रुव ग्लोबल स्कूल ने बालवाडी…
Virat Kohli

विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला क्रिकेटपटू

Posted by - May 14, 2023 0
जयपूर : यंदाच्या आयपीएलमधील (IPL) 60 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात पार पडत आहे. हा…
Shreyanka Patil

Shreyanka Patil : भारताच्या श्रेयांका पाटीलने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली गोलंदाज

Posted by - September 4, 2023 0
नवी दिल्ली: भारताची युवा ऑफ स्पिनर श्रेयांका पाटील (Shreyanka Patil) सध्या वेस्ट इंडिजमध्ये महिला कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत आहे. श्रेयांका…

पुणे : अखेर…! अफजल खान वधाचा जिवंत देखावा सादर करण्यासाठी परवानगी मिळाली , वाचा सविस्तर

Posted by - August 24, 2022 0
पुणे : अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्यावरून पुण्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता . कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *