Maratha Reservation

Maratha Reservation : जालन्याच्या तरूणाने मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

333 0

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत एका आंदोलकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुनिल बाबुराव कावळे असं या आत्महत्या केलेल्या मराठा आंदोलकाचे नाव आहे. सुनिल बाबुराव कावळे हे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील चिकनगाव येथील रहिवासी आहेत. ते संभाजीनगर येथील एका बिल्डरकडे ड्रॅयव्हर म्हणून काम करत होते.

काल सायंकाळच्या वेळेस त्यांनी घरी सांगितलं की मी कामाला चाललो म्हणून निघून गेले. पहाटेच्या वेळेला त्यांनी वांद्रे येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान त्यांनी आत्महत्येपूर्वी मराठा आरक्षण एकच मिशन अशी चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. त्यांच्या माघारी पत्नी एक मुलगाआणि एक मुलगी असा परिवार आहे.

सुनील बाबुराव कावळे पार्थिव शवविच्छेदनासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ सायन रुग्णालयमध्ये जाऊन मयत तरुणाच्या कुटुंबाची भेट घेणार आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Share This News

Related Post

Yerwada Jail

Yerawada Jail : येरवाडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

Posted by - June 20, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune) येरवाडा कारागृहामधून (Yerawada Jail) एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवाडा कारागृहात (Yerawada Jail) दोन गटात…
Maratha Reservation

Maratha Reservation : बीडमधील जाळपोळ, तोडफोड प्रकरणात 6 गुन्हे दाखल

Posted by - October 31, 2023 0
बीड : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे…

संतोष परब हल्ला प्रकरणाचा कट पुण्यात आखला ; नितेश राणेंना पुण्याला हलवणार

Posted by - February 3, 2022 0
सिंधुदुर्ग – शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ल्याचा कट पुण्यात आखण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे तपासासाठी भाजप आमदार…
milind deora

Milind Deora : ‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Posted by - January 14, 2024 0
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसला सोठचिठ्ठी दिल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी…
Leap Day 2024

Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी

Posted by - February 29, 2024 0
मुंबई : जवळपास दर चार वर्षांनी, 29 फेब्रुवारीच्या (Leap Day 2024) रूपात कॅलेंडरमध्ये एक अतिरिक्त दिवस जोडला जातो ज्याला लीप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *