Garba

Navratri 2023 : नवरात्रौत्सवसाठी राज्य सरकारच्या नव्या गाइडलाइन जारी

1620 0

मुंबई : मुंबईसह राज्यभरात नवरात्री (Navratri 2023) मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. नवरात्रीत मोठ्या प्रमाणात गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. यासाठी सरकारकडून आता नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

काय आहेत नव्या गाइडलाइन?
मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना सहभागी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

रास दांडिया खेळताना अनेकदा लोक भान विसरून नाचतात, अशावेळी काही वेळा हृदयावर अतिरिक्त ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्यासारख्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. अनेक अहवालानुसार, कोरोना कालखंडानंतर अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे समजले आहे. त्यामुळे अनेक जीवनशैली विकार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कोणतीही वैद्यकीय परिस्थिती उदभवल्यास त्या व्यक्तीला तत्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊनच मुख्यमंत्र्यांनी अशी सुविधा सर्व आयोजकांनी यावेळी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Share This News

Related Post

uddhav thackeray

Uddhav Thackeray : धारावीकरांना जिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

Posted by - December 16, 2023 0
मुंबई : मुंबईतील धारावी पुनर्विकास योजनेविरोधा ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज भव्य मोर्चा काढला. धारावी प्रकल्पातून निर्माण होणारा टीडीआर विकत…

देशी गायीच्या विस्तार कार्यक्रमासोबतच संशोधनाची गरज – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

Posted by - May 28, 2022 0
पुणे- देशी गायीची दूध देण्याची क्षमता प्रतिदिन १२ ते १५ लिटर होण्यासाठी अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला होळी व धुलिवंदनाच्या सर्वांना शुभेच्छा

Posted by - March 17, 2022 0
“समाजातील दुष्प्रवृत्तींचं होळीत दहन होऊ दे, सत्प्रवृत्तींची ज्योत सर्वांच्या हृदयात तेवत राहू दे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील…
Imran Khan

इम्रान खान यांचे सरकार जाणार की टिकणार ? आज रात्री अविश्वास ठराव मांडला जाणार

Posted by - March 28, 2022 0
कराची- पाकिस्तानसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पाकिस्तानमध्ये सत्तेवरून राजकीय गोंधळ सुरू आहे. इम्रान खान आपली खुर्ची वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर पुन्हा बदनामीकारक मजकूर; पुण्यातील महिलेविरोधात फिर्याद दाखल

Posted by - December 16, 2022 0
पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील सौदामिनी हॅन्डलूम्स या दुकानाच्या संचालिका अनघा घैसास या महिलेने राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *