Share Market

Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदाराना झाला मोठा फायदा

416 0

भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 19,800 अंकाची पातळी ओलांडली आहे. आज जेव्हा शेअरमार्केट बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 393.69 अंकांनी वधारत 66,473.05 वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 121.50 अंकांच्या तेजीसह 19,811.35 वर स्थिरावला.

आजच्या व्यवहारात, एफएमसीजी सेक्टरमध्ये झालेल्या खरेदीमुळे निफ्टी एफएमसीजी निर्देशांक 0.85 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाला. निफ्टी एनर्जी 0.89 टक्के, मेटल, बँकिंग, फार्मा, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, ऑटो सेक्टरमधील शेअर्स तेजीसह बंद झाले. तर आयटी आणि पीएसयू बँक सेक्टरमध्ये घसरण दिसून आली.

आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 24 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली. तर, निफ्टीच्या 50 कंपन्यांपैकी 39 कंपन्यांच्या शेअर्स दरात वाढ दिसून आली.आजच्या व्यवहारात विप्रोच्या शेअर दरात 3.39 टक्क्यांची तेजी दिसून आली. तर, अल्ट्राटेक सिमेंटमध्ये 2.09 टक्के, रिलायन्स 1.62 टक्के, एचयूएल 1.57 टक्के, नेस्ले 1.15 टक्क्यांनी वधारले. एचसीएल टेकच्या शेअर दरात 1.51 टक्क्यांची घसरण दिसून आली. टीसीएस 0.42 टक्के, एसबीआय 0.41 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

Share This News

Related Post

अर्थकारण : तुम्हाला माहित आहे का ? लॉकरमधील दागिन्यांचाही असतो विमा; वाचा सविस्तर प्रकिया

Posted by - October 28, 2022 0
अर्थकारण : सध्या वाढते चोरी आणि दरोड्यांचे प्रमाण पाहता प्रत्येक घराच्या करत्या पुरुषाला आणि गृहलक्ष्मीला काळजी असते ती लॉकर मधल्या…
UPI Payment

UPI Payment : UPI युजर्ससाठी महत्वाची बातमी ! 31 डिसेंबरच्या आधी करा ‘हे’ काम अन्यथा यूपीआय नंबर होईल बंद

Posted by - November 18, 2023 0
आजकाल सगळीकडे ऑनलाईन पेमेंट (UPI Payment) करण्यात येते. जर तुम्हीदेखील ऑनलाईन पेमेंट करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. नॅशनल…

रिलायन्सची दमदार कामगिरी, तिमाहिमध्ये 16 हजार 203 कोटींचा नफा

Posted by - May 7, 2022 0
मुंबई -रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी मार्चअखेर तिमाहीत २२.५ टक्क्यांच्या भरीव वाढीसह, १६,२०३ कोटी रुपयांच्या तिमाही नफ्याची नोंद करणारी आर्थिक कामगिरी…

अर्थकारण : जमीन खरेदी करताय? मोठ्या आर्थिक व्यवहारापूर्वी अवश्य माहित असाव्यात ‘या’ कायदेविषयक बाबी

Posted by - October 8, 2022 0
गेल्या काही वर्षांपासून जमीन, जागा, घरे, फ्लॅट आदी स्थावर मालमत्तांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तसेच खरेदीदारांची व्यवहारात फसवणूक होण्याच्या घटनाही…
1 April

New Financial Rules : लोकांच्या खिशाला बसणार कात्री ! ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

Posted by - April 1, 2024 0
आजपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात (New Financial Rules) होत असून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल झाले आहेत. नवीन आर्थिक वर्ष लागू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *