Eknath Khadse

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाचा दणका ! भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ‘ती’ याचिका फेटाळली

640 0

मुंबई : पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हायकोर्टाने दणका दिला आहे. पुण्यातील भोसरी येथील या भूखंड घोटाळा प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाने खडसे यांची याचिका फेटाळली आहे. या याचिकेत एसीबीने दाखल केलेला गुन्हा रद्द करा, अशी मागणी करण्यात आली होती.

पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळ्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात ACB नं गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात कारवाई न करण्याचा दिलासा हायकोर्टाने यापूर्वी दिला होता.एकनाथ खडसे, पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी यावर आक्षेप घेण्यात आले आहे. यादरम्यान ACB नं दाखल केलेला गुन्हा रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका एकनाथ खडसे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मात्र, खडसे यांची ही याचिका हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. यामुळे आता खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काय आहे भोसरी भूखंड घोटाळा?
भोसरीतील एमआयडीसी भूखंड घोटाळा प्रकरणात आरोप असा होता की, एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 2016 मध्ये भोसरीतील एमआयडीसीमध्ये एक जमीन खरेदी केली होती. 3.75 कोटी रूपयांना ही जमीन खरेदी केली होती. या व्यवहाराची नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात रीतसर करण्यात आली. मात्र या जमीनीचा मूळ बाजारभाव 31 कोटी रूपये असताना गिरीश यांनी तो फक्त तीन कोटी रूपयांना विकत घेतला. हा भूखंड एमआयडीसीच्या मालकीचा असल्याने तो इतका कमी किमतीत कसा काय विकत घेतला. यांसह अनेक मुद्यावरून ईडीने तपास सुरू केला.

Share This News

Related Post

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल- पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता

Posted by - August 17, 2022 0
पुणे : ऐतिहासिक, धार्मिक आणि स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभुमी असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन आणि संग्रहालयच्या माध्यमातून आपल्या क्रांतिकारकांनी केलेली कामगिरी…

कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी असे आहेत वाहतुकीतील बदल

Posted by - May 3, 2022 0
पुणे- कर्वे रस्त्यावर बांधण्यात आलेल्या दुमजली उडडाणपुलामुळे वाहतुकीची कोंडीचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र येथील वाहतुकीचा प्रश्न जैसे थे…

पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे आरओ प्रकल्प व थेट दर्शनसेवेचा शुभारंभ

Posted by - May 17, 2022 0
पुणे – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू व शरद…
Sonia Gandhi Health

Sonia Gandhi Health : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Posted by - September 3, 2023 0
मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi Health) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आल्यानं सोनिया…

डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येचे गूढ उकलले; पतीनेच केला खून

Posted by - February 5, 2022 0
नाशिकमधील डॉ. सुवर्णा वाजे खुनप्रकरणाचे गूढ अखेर उलगडले आहे. पोलिसांना कारमध्ये जळालेल्या हाडांचा ‘डीएनए’ अहवाल मिळालेला असून, ही हाडे डॉ.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *