भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डीजेमुक्त करण्याचा निर्धार

1342 0

पुणे: पुण्यासह राज्यातील आंबेडकरी जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आगामी जयंती उत्साहात मात्र डीजे आणि लेझर या गोष्टी टाळून करावी असे आवाहन आज पुण्यातील बैठकीत करण्यात आले. त्याचबरोबर आपल्याशी संबंधित मंडळांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर या वर्षीपासून बंद करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. यासोबतच पुणे शहरातील विविध मंडळे आणि विहारांना भेट देऊन त्यांनी जयंतीमध्ये डीजेचा वापर करू नये यासाठी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा निर्णय या निमित्ताने घेण्यात आला.

वरिष्ठ पत्रकार व कॅटालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या वतीने डॉल्बीमुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात आंबेडकरी नेते, प्राध्यापक, पत्रकार, डॉक्टर यांनी सहभाग घेतला.

माजी आमदार जयदेव गायकवाड, पुण्याचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, सवित्रीबाई फुले विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे विभाग प्रमुख डॉ. मनोहर जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विजय जाधव, दलित चळवळीचे अभ्यासक केशव वाघमारे, डॉ. पवन सोनवणे, नागपूर विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे विभागप्रमुख डॉ.अविनाश फुलझेले,लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष संजय आल्हाट, माजी सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, पत्रकार निखिल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र गायकवाड, अनिल माने आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी सुनील माने म्हणाले, आंबेडकरी जनतेचे अजूनही शिक्षण,नोकरी असे विविध प्रश्न सुटलेले नाहीत. अशा परिस्थितीत बाबासाहेबांच्या जयंती निमित्त लोकांना त्रास होईल असे वर्तन करण्यापेक्षा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाबासाहेब ज्ञानसूर्य होते त्यामुळे त्यांना विचारांनी मानवंदना देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याची सुरुवात पुण्यातून व्हावी यासाठी ही बैठक घेण्यात आली. पुण्यात डॉल्बीमुक्त जयंती व्हावी यासाठी सामुदायिकरित्या प्रयत्न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. वैचारिक जयंती साजरी करण्यासाठी आम्ही कॅटलीस्ट फाउंडेशन मार्फत बाबासाहेबांच्या विचारांवर तसेच त्यांच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्ररथाच्या माध्यमातून उलघडण्याचे नियोजन केले होते. मात्र कोविडमुळे ही रक्कम गरजूंना अन्न व धान्य वाटण्यासाठी आम्ही खर्च केली. भविष्यात अशा पद्धतीची जयंती साजरी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. डॉल्बी लावणाऱ्या मंडळांना सहकार्य न करण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला.

माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी डॉल्बीमुक्त जयंतीसाठी समाजाचे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले. यासाठी शासकीय पातळीवर यसाठी पुढाकार घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. बाबासाहेब हे बौद्धिकतेचे प्रतिक असल्याने त्यांच्या जयंती निमित्त बौद्धिक पातळीवरील आनंद व्यक्त केला पाहिजे असे सांगितले.

माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी उत्सव साजरा करताना लोकांना भान राहत नसल्याचे सांगितले. त्यामुळे ससून हॉस्पिटलच्या १०० मिटर परिसरात ही डीजे च्या ठेक्यावर तरुणाई नाचत असते हे दुर्दैवी असल्याचे सांगितले. विमानतळाच्या परिसरात लेझर किरणांसाठी बंदी असतानाही लोहगाव विमानतळ परिसरात मिरवणुकीत सर्रास लेझर किरणे वापरली जातात. यामुळे एखादा मोठा विमान अपघात घडू शकतो. हे थांबवण्यासाठी शासन आणि प्रशासनाने डीजे आणि लेझरच्या वापरावर बंदी घातली पाहिजे असे मत व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी, डीजे मुळे राज्यात ७ तर पुण्यात २ जणांचे मृत्यू झाल्याचे सांगत डीजे आणि लेझरचा वापर टाळण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. माध्यमांनी या लढ्यात अग्रस्थानी राहून व्यापक जनमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

केशव वाघमारे यांनी, अशाप्रकारे डीजे आणि लेझर मुळे होणारे तोटे तरुण मंडळांना समजावून सांगितले पाहिजे असे मत व्यक्त केले. यासाठी पोलिसांनी आणि प्रशासनाची सुद्धा मदत घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले.

 

Share This News

Related Post

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण ; महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे आंदोलन

Posted by - May 18, 2022 0
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ महाविकासआघाडीमधील घटक पक्षांनी बालगंधर्व चौकात आज मूक आंदोलन…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसींग लिंक’ प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 10, 2022 0
पुणे : जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार…

चांगली बातमी ! ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला केंद्राचा हिरवा कंदिल, कधी सुरु होणार

Posted by - June 15, 2022 0
नवी दिल्ली- अखेर टेलिकॉम कंपन्यांची प्रतीक्षा संपली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचार सेवांसाठी ५ जी स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान…
Ajit Pawar

Ajit Pawar : साहेबांना आणि मुलीला मतदान केलं आता सुनेला मतदान करा; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन

Posted by - April 9, 2024 0
बारामती : महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार (Ajit Pawar) यांच्या नावाची घोषणा होताच बारामतीमधील राजकारणाने कमालीचा वेग…

पुण्यात थरार : ” तू जर व्याजाचे पैसे दिले नाही, तर आम्ही तुझे हात कापू ! गजा मारणे टोळीतील पप्पू कुडलेने कोणाला दिली धमकी, वाचा काय आहे प्रकरण..

Posted by - January 6, 2023 0
पुणे : पुण्यातील येरवडा चौकात गजा मारणे टोळीतील पप्पू कुडले यानं व्याजाचे पैसे दिले नाहीत तर तुझे हात कापू अशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *