Toll Plaza

Nitin Gadkari : आता राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास होणार सुखकर; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

1532 0

मुंबई : देशभरातील महामार्ग आणि रस्ते सुधारण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयाचे संपूर्ण देशात कौतुक होताना दिसत आहे. गडकरी यांनी टोल टॅक्सपासून फास्टॅगपर्यंत अनेक निर्णय जाहीर केले आहेत. यादरम्यान आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. याचा फायदा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. चला तर मग त्यांनी नेमकी कोणती घोषणा केली? ते जाणून घेऊया..

केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या धोरणावर काम करत आहे. यासोबतच बीओटीद्वारे रस्ते बांधणीलाही प्राधान्य दिले जात आहे. 2023 अखेरपर्यंत राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे रस्ते तीन प्रकारे बांधले जातात. ‘बिल्ड-ऑपरेट-हँडओव्हर’ (BOT) व्यतिरिक्त, यामध्ये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम आणि हायब्रिड अ‍ॅन्युइटी मॉडेल यांचा यामध्ये समावेश आहे.

ईपीसीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची गरज लवकर सुरू होते. त्याच बरोबर BOT च्या माध्यमातून रस्ते चांगले बनवले जातात. कारण पुढील 15-20 वर्षे देखभालीचा खर्च त्यांना उचलावा लागतो, हे ठेकेदाराला माहीत आहे. त्यामुळे आम्ही BOT च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधण्याचा निर्णय घेतल्याचे गडकरींनी सांगितले.

Share This News

Related Post

Pune Crime

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं ! प्रेमसंबंधातून दोन सख्या भावांकडून बहिणीची हत्या

Posted by - September 17, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : आपण सगळ्यांनी नागराज मंजुळेंचा सैराट हा चित्रपट पहिलाच असेल. त्यामध्ये दाखवलेल्या कथेची पुनरावृत्ती छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)…

भाजपाचं ‘मिशन बारामती’; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामतीत

Posted by - September 5, 2022 0
बारामती: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी लोकसभा…
Breaking News

Breaking News ! राज्यातील सत्तासंघर्षाबाबतची महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता ‘या’ दिवशी होणार

Posted by - July 31, 2022 0
महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता 3 ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या पीठासमोर ही सुनावणी देण्यात आली…

राऊत नहीं तो क्या हुआ ? उनके नाम की कुर्सी ही काफी है..!

Posted by - September 21, 2022 0
गोरेगावातील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा भरवण्यात आलाय. या मेळाव्यास देशभरातील गटप्रमुख आपली हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याच्या व्यासपीठावर ठेवण्यात…
Team India

Team India Head Coach : BCCI ने टीम इंडियाच्या हेड कोचचे नाव केले जाहीर; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली टीमची कमान

Posted by - November 29, 2023 0
मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आज टीम इंडियाच्या हेड कोचची (Team India Head Coach)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *