Stamp Paper

Stamp Paper : 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार रद्द

1061 0

मुंबई : प्रतिज्ञापत्र, खरेदी-विक्री करार यासारख्या कायदेशीर गोष्टींसाठी वापरला जाणारे 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर आता व्यवहारातून रद्द होणार आहेत. त्याऐवजी तेवढ्याच किमतीचे स्टॅम्प पेपर राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून मिळणार आहेत. त्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना स्टॅम्प पेपरसाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. यासंदर्भात महसूल विभागाकडून प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

भारतात स्टॅम्प पेपरचे दोन प्रकार आहेत. न्यायिक स्टॅम्प पेपर आणि गैरन्यायिक स्टॅम्प पेपर. कायदेशीर किंवा आर्थिक दस्तऐवजांच्या अंमलबजावणीसाठी स्टॅम्प पेपर वापरला जातो. ते अधिकृत मुद्रांक विक्रेते किंवा सरकार मान्यताप्राप्त बँकांमध्ये मिळतात. स्टॅम्प पेपरवर मुद्रांक शुल्क भरले जाते. स्टॅम्प पेपरचे मूल्य व्यवहाराच्या मूल्यावर अवलंबून असते. त्यानुसार योग्य स्टॅम्प पेपर वापरला जातो. अब्दुल करीम तेलगीच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यामुळे महसूल विभागाच्या अखत्यारित येणार्‍या मुद्रांक व शुल्क नोंदणी विभागाने 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारातून रद्द करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

सध्या फक्त 10 हजार रुपयांचा स्टॅम्प पेपर बँकेतून फ्रॅकिंग करून दिला जात आहे. यापूर्वी मिळणारे पाच व दहा हजार रुपयांचे स्टॅम्प पेपर 2015-16 च्या दरम्यान बंद करत फक्त 100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर कायदेशीर व्यवहारात ठेवले आहेत. आता या किमतीचे स्टॅम्प पेपर व्यवहारातून रद्द करून थेट राष्ट्रीय बँकेतून फ्रॅकिंग करून देण्याचा निर्णय महसूल विभागाकडून घेण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र यासह पाच राष्ट्रीय बँकांबरोबरच तालुकापातळीवरही स्टॅम्प पेपर फ्रॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

#KOLHAPUR : वृद्धाश्रमात मन मोकळं केलं; एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं !वयाच्या सत्तरीत अडकले विवाह बंधनात

Posted by - February 26, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापुरातील घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमातील दोघा वृद्धांनी वयाच्या सत्तरीमध्ये लग्न गाठ बांधली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अनुसया शिंदे…

पाकव्याप्त काश्मीरमधील चिनी बनावटीचा पूल तुटला, लाइव्ह व्हिडिओ पाहा

Posted by - May 9, 2022 0
पाकव्याप्त काश्मीर मधील चिनी बनावटीचा एक मोठा पूल बघता बघता तुटला आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेला आहे. ही घटना…
eknath shinde

Cabinet Meeting : दिवाळीनंतर पार पडलेल्या पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले ‘हे’ मोठे निर्णय

Posted by - November 17, 2023 0
मुंबई : आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला…

मुंबईत रेल्वे प्रवाशाला मारहाण करत लुटले, घटना सीसीटीव्हीत कैद (व्हिडिओ)

Posted by - May 19, 2022 0
मुंबई- मुंबईतील विरार रेल्वे स्थानकात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशाला मारहाण चोरट्यांनी त्याच्याकडील सोनसाखळी आणि मोबाइल चोरून नेला.…

क्रूरतेचा कळस ! पत्नीला झोपेतून उठवत धावत्या ट्रेनखाली दिलं ढकलून ; अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ

Posted by - August 23, 2022 0
मुंबई : वसई रेल्वे स्टेशनवरून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. वसई रेल्वे स्टेशनच्या 5 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *