Nanded News

Nanded News : नांदेड हळहळलं ! शेवटपर्यंत साथ निभावली; पतीच्या निधनानंतर पत्नीनेदेखील सोडला जीव

535 0

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यामुळे पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असतानाच पत्नीनेदेखील आपला जीव सोडला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील वळग या ठिकाणी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. पतीच्या निधनानंतर एक दिवसाच्या अंतराने पत्नीचे निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.या दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगाधर नागाजी चंदावाड (वय 70 वर्षे) आणि अंजनाबाई गंगाधर चंदावाड (वय 65 वर्षे) असे मृत पती -पत्नींची नावे आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
वळग गावातील गंगाधर चंदावाड आणि अंजनाबाई यांनी लग्नानंतर आयुष्याचे 50 वर्षे सोबत घातले. मात्र, अंजनाबाई आजारी पडल्याने गंगाधर चंदावाड यांच्या डोक्यावर आघात झाल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यामुळे चंदावाड दुःखाचे डोंगर कोसळले. याच सर्वाधिक धक्का अंजनाबाई यांना बसला होता. दरम्यान, गंगाधर यांच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू असतानाच दुसऱ्या दिवशी अंजनाबाई यांनी देखील आपले प्राण सोडले. पतीने जीव सोडला म्हणून पत्नीच्या डोक्यावरही आघात झाला आणि त्यांनी देखील पतीप्रमाणेच जगाचा निरोप घेतला.

गंगाधर चंदावाड आणि अंजनाबाई यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वडिलापाठोपाठ आईनेही प्राण सोडल्यामुळे त्यांची मुले व नातवंडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.एकाचवेळी पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

Priya Singh

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

Posted by - December 18, 2023 0
ठाणे : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहला (Priya Singh) कारने चिरडण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना…
Pune News

Pune News : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने पुणे विद्यापीठाच्या आवारात जोरदार राडा

Posted by - September 4, 2023 0
पुणे : गणेशोत्सवासाठी वर्गणी न दिल्याने तिघांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune News) आवारातील सेवक…

सर्वसामान्यांचा गृहप्रवेश प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - November 25, 2022 0
मुंबई : सन 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट असून आता ‘अमृत महाआवास योजना’ 2022 –…

यासिन मलिक याला फाशी की जन्मठेप ? आज दुपारी होणार निर्णय

Posted by - May 25, 2022 0
नवी दिल्ली- काश्मिरी फुटरतावादी नेता यासिन मलिक याला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता त्याच्या शिक्षेबाबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *