होळी, धुळवड साजरी करण्याबाबतची नियमावली मागे, ठाकरे सरकारचा निर्णय

430 0

मुंबई- होळी आणि धुळवड साजरी करण्यावर राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र या निर्बंधाला विरोधकांकडून होत असलेला विरोध पाहून ठाकरे सरकारने हे निर्बंध मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आज 17 मार्च रोजी होळीचा सण साजरा होत आहे. आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचे पालन करुन साजरा करावा.असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. सरकारकडून नियमावली देखील जारी करण्यात आली होती. मात्र विरोधकांकडून होत असलेल्या टीकेनंतर राज्यसरकारने सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे यंदा होळी आणि धुळवड धुमधडाक्यात साजरी करता येणार आहे.

होळी आणि धुलिवंदन साजरी करण्यास कोणतीही सरकारी हरकत नाही. मात्र,दक्षता पाळून साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. स्थानिक पातळीवर असलेल्या प्रशासकीय नियमांचे पालन आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

काय होती नियमावली ?

रात्री दहाच्या आत होळी पेटवणे बंधनकारक

होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी

राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर जोरात लाऊड स्पीकर लावू नये

होळी साजरी करताना मद्यपान आणि उद्धट वर्तन केल्यावर सुद्धा संबंधितांवर कारवाई होणार

होळी सणानिमित्त जमा होणाऱ्या महिलांची व मुलींची कोणीही छेड काढणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.

कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा नको

धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

कुठेही आग लागेल असे कृत्य करू नये

Share This News

Related Post

Justice Fathima Beevi

Justice Fathima Beevi : सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती फातिमा बीवी यांचं निधन

Posted by - November 23, 2023 0
केरळ : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती आणि तामिळनाडूच्या माजी राज्यपाल फातिमा बीवी (Justice Fathima Beevi) यांचे वयाच्या 96 व्या…

54 शेळ्या एका तासातच दगावल्या ! इंदापूर मधील युवा शेतकऱ्यांवर कोसळले संकट

Posted by - May 9, 2022 0
इंदापूर- पारंपरिक शेती न करता अधिकच्या उत्पन्नासाठी इंदापूरच्या दोन तरुणांनी शेळीपालन व्यवसाय सुरु केला. धाडस करून त्यांनी 54 शेळ्या आणि…
sucide Nagpur

क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्यामुळे तरुणाची नैराश्यातून आत्महत्या

Posted by - May 23, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका क्षणात संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. यामध्ये क्रिकेट…

पुणेकरांना दिलासा! संततधार पावसामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठा वाढला

Posted by - July 8, 2022 0
पुणे: शहरात व धरण क्षेत्रात२-३ दिवस मुसळधार पाऊस पडत पडल्यामुळे खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून गेल्या २४ तासात ०.७९टीएमसी पाणीसाठा…

नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर हादरले! 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू

Posted by - October 3, 2023 0
नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी आहे. शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *