Monsoon News

Monsoon News : ‘या’ तारखेनंतर परतीचा मान्सून माघारी फिरणार, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

495 0

नैऋत्य मान्सूनसंदर्भात भारतीय हवामान विभागाने (Monsoon News) नवीन अंदाज वर्तवला आहे. 25 सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात आज आणि उद्या चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे.

सध्या देशातील काही राज्यात चांगला पाऊस कोसळत आहे. मात्र, काही भागात पावसानं दडी मारल्याचे दिसत आहे. अद्यापही शेती पिकांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीतच परतीच्या मान्सूनचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

23 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 24 ते 26 सप्टेंबर(रविवार ते मंगळवार) दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

राज ठाकरे यांचे औरंगाबादमध्ये जंगी स्वागत, उद्याच्या सभेची सर्वांना प्रतीक्षा

Posted by - April 30, 2022 0
औरंगाबाद- मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम…

प्रियांका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करून दिले राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

Posted by - May 5, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला ४…

समाजातील सर्व घटकांनी मेट्रोने प्रवास करावा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन

Posted by - March 6, 2022 0
पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते महत्त्वाकांक्षी अशा पुणे…

मग, मातोश्रीवर हल्ला करायचा होता; तेव्हा कळलं असतं… आ.दिलीप मोहिते यांचं वक्तव्य

Posted by - April 10, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर एस.टी कामगारांनी केलेल्या हल्ल्यांनंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. दरम्यान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *