Relationship Tips

Relationship Tips : तुमचा पार्टनर तुम्हाला धोका देतोय हे कसं ओळखाल?

464 0

वैवाहिक जीवनातील (Relationship Tips) सर्वात मोठं तत्व म्हणजे प्रामाणिकपणा. जेव्हा हा प्रामाणिकपणा कमी होऊ लागतो, तेव्हा या नात्याला तडा जातो. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता आणि तो व्यक्ती तुम्हाला धोका देत असेल तर जास्त वाईट वाटते. जेव्हा पुन्हा पुन्हा गोष्टी लपविण्याचा प्रयत्न केला तर ते कठीण होऊ लागते. तर आज आम्ही तुम्हाला अश्या काही टिप्स देणार आहे ज्यावरून तुम्हाला समजेल तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही लपवत तर नाही ना?

1. जर तुम्हाला पक्क माहित असेल की तुमचा पार्टनर हा तुम्हाला धोका देतोय तर त्याला याची लाज वाटेल असं वातावरण तयार करा. त्याला समजू द्या की तो चिट करतोय हे तुम्हाला माहित आहे. याने लाजून का होईना तो त्याची चूक कबूल करेल.

2. जर तुम्ही रागाच्या भरात मोठ्या आवाजात त्याच्याशी बोललात तर कदाचित तुमचा पार्टनर खरं सांगणार नाही. त्यामागे दोन कारणे असू शकतात. एकतर त्याचा इगो आणि दुसरं म्हणजे भीती. त्यामुळे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची कबूली घेताना सावकाश आणि शांत डोकं ठेवून बोला.

3. तुम्ही त्याच्यासोबत ट्रुथ ऑर डेअर हा गेम खेळा. तो खेळ खेळताना असे प्रश्न विचारा की त्याला गिल्ट होईल. त्याच्याकडून एक चूक झालेली आहे हे इमोशनली त्याला आठवण करुन द्या. अशाने तो तुमच्यासमोर खरं बोलेल.

4. जेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी बोलायला तयार होईल तेव्हा कोणत्याही प्रकारचे प्रश्न न विचारता किंवा त्याच्या संवादात अडथळा निर्माण न करता त्याचे शांतपणे ऐकून घ्या.

5. तुमचा पार्टनर खरं बोलत नसेल तर त्याला तुम्ही एकमेकांसोबत घालवलेल्या गोड क्षणांची आठवण करून द्या. त्याला प्रेमाचे व तुमच्या नात्याचे महत्त्व पटवून द्या. अशाने एक न एक दिवस त्याने केलेली चूक आठवेल आणि तुमच्यासमोर कदाचित खरं बोलेल.

रिलेशनशीपमध्ये चीट करण्याचे अनेक प्रकार समोर येताना पाहायला मिळतात. हल्लीच्या फास्ट जगात जेवढ्या लवकर कपल्स जवळ येतात तेवढ्याच लवकर त्यांमध्ये दुरावा देखील निर्माण होतो. त्यामुळे तुम्हीही कोणाच्या प्रेमात असाल तर विचारपूर्वक पावलं उचला.

Share This News

Related Post

Love Vs Attraction

तुम्ही करताय ते ‘प्रेम’ आणि की ‘शारीरिक आकर्षण’?

Posted by - August 9, 2023 0
प्रेमात पडायला कोणाला (Love Vs Attraction) आवडत नाही. प्रेमात पडलं की व्यक्ती आजूबाजूच्या गोष्टी विसरतो असं म्हणतात… मुळात एखादी व्यक्ती…
Kidney Problem

Kidney Problem : किडनीच्या रुग्णांनी चुकूनही ‘हे’ पदार्थ खाऊ नका; अन्यथा होईल गंभीर आजार

Posted by - December 1, 2023 0
किडनीचा त्रास (Kidney Problem) हा गंभीर आजारांपैकी एक आहे. जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचे एकंदर आरोग्य चांगले राहते.…

जान्हवी कपूरचा हिरव्या साडीतील हॉट लूक पाहून तुम्ही सुद्धा व्हाल घायाळ

Posted by - May 5, 2022 0
श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिने सध्या सोशल मीडियावर कल्ला केला आहे. अलीकडेच तिने साडी परिधान केलेले आकर्षक फोटो तिच्या इंस्टाग्राम…
Sleeping Positions

Sleeping Positions : बेडरुमधील रोमान्स अधिक रोमँटिक करायचा असेल तर ‘या’ 15 Sleeping Positions नक्की ट्राय करा

Posted by - August 10, 2023 0
जोडप्यामधील लैंगीक संबध अर्थात सेक्स (Sleeping Positions) हे प्रजनन वाढीसाठी खूप महत्वाचे असते. यामुळे एकमेकांसोबतची जवळीक प्रेम आणखी वाढते. नात्यामधील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *