Ganesh Chaturthi 2023

Ganesh Chaturthi 2023: यंदाची गणेश चतुर्थी असणार खास ! तब्बल 300 वर्षांनंतर जुळून येणार ‘हा’ अद्भुत योग

422 0

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाला आद्य देवता मानले जाते. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणेशाची पूजा (Ganesh Chaturthi 2023) केली जाते. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे.या वर्षीच गणेश चतुर्थी खास असणार आहे. यावर्षी तब्बल 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एक विलक्षण योगायोग जुळून येणार आहे. चला तर मग आज त्याच्याबद्दल जाणून घेऊया…

गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ योगायोग
यंदा तब्बल 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एक विलक्षण योगायोग घडत आहे. यंदा अंगारक योगात ही चतुर्थी आल्याने खास महत्व प्राप्त झाले आहे. तसेच यंदा गणेश चतुर्थीला ब्रह्मयोग आणि शुक्ल योग असे शुभ योग तयार होत आहेत. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून देशभरात गणेश चतुर्थी उत्सव सुरू होतो. हा उत्सव प्रामुख्याने 10 दिवस चालतो. या वेळी भक्त बाप्पाला आपल्या घरी आणतात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देतात.

श्री गणेशाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त
यंदाच्या वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 ला आहे. पंचांगानुसार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी चतुर्थीला प्रारंभ होईल, तर 19 सप्टेंबर रोजी 1 वाजून 42 मिनिटांनी चतुर्थी समाप्त होईल. त्यामुळे श्री गणेश चतुर्थी उदयोतिथीनुसार 19 सप्टेंबरला साजरी केली जाईल आणि या दिवसापासूनच गणेशोत्सवाला सुरुवात होईल. श्री गणेशाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत आहे.

गणेश चतुर्थी 2023 महत्व
हिंदू धर्मात भगवान गणेश हे पहिले पूजनीय देवता तसेच बुद्धी, आनंद, समृद्धी देणारे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला स्वाती नक्षत्रात आणि सिंह राशीत झाला होता. अशा परिस्थितीत जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी गणपतीची मूर्ती बसवणार असाल तर ती दुपारच्या शुभ मुहूर्तावर बसवावी.

(टीप : वरील सर्व माहिती टॉप न्यूज मराठी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यामधून टॉप न्यूज मराठी कोणताही दावा करत नाही)

Share This News

Related Post

राऊत नहीं तो क्या हुआ ? उनके नाम की कुर्सी ही काफी है..!

Posted by - September 21, 2022 0
गोरेगावातील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा भरवण्यात आलाय. या मेळाव्यास देशभरातील गटप्रमुख आपली हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याच्या व्यासपीठावर ठेवण्यात…

#BEAUTY TIPS : चेहऱ्यावरील मुरुमांपासून मिळेल सहज सुटका, फक्त वापरा हे सोपे होममेड फेस पॅक

Posted by - March 20, 2023 0
#BEAUTY TIPS : मुरुम आणि पिंपल्स ही एक समस्या आहे जी केवळ चेहऱ्यावरच नाही तर मनावरही परिणाम करते. पिंपल्समुळे अनेकांचा…
Archana Patil

Archana Patil : चर्चेतील चेहरा : अर्चना पाटील

Posted by - April 5, 2024 0
पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील (Archana Patil) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित…

जागतिक एड्स दिवस : 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन का साजरा केला जातो ? जाणून घ्या

Posted by - December 1, 2022 0
जागतिक एड्स दिवस : दरवर्षी १ डिसेंबर रोजी अर्थात आज जगभरात जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *