Document News

Document News : कामाची बातमी ! ‘या’ एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून होणार नियम लागू

704 0

येत्या एका ऑक्टोबरपासून देशान नवा नियम लागू होणार आहे. आपल्या प्रत्येकासाठी हा नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक ऑक्टोबरपासून जन्म दाखला सिंगल डॉक्यमेंटच्या स्वरुपात (Document News) वापरला जाणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातलं विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पास केलं होतं. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.हा नियम लागू झाल्यानंतर इतर कागदपत्रांची (Document News) आवश्यतकता भासणार नाही.

त्यामुळे आता शाळा-कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट असो की आधारकार्ड बनवायचं असेल तर ही सर्व कामं आता जन्मदाखल्यावर करता येणार आहेत. यामुळे अनेक कागदपत्र दाखवण्याची गरज आता भासणार नाही. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे मुलांचा जन्मदाखला पालकांच्या आधारकार्डशी जोडला जाणार आहे. जन्म-मृत्यूच्या नोंदी ठेवण्यासाठी सरकार एक डेटाबेस तयार करणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूरी मिळाली होती.

काय आहे नवा नियम?
नव्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला तर रुग्णालय त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यूचा दाखला देईल. रुग्णालयाबाहेर म्हणजे घरात किंवा एखाद्या ठिकाणी व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीवर उपचार करणार डॉक्टर मृत्यूचा दाखला देईल. रजिस्ट्राररला जन्म आणि मृत्यूची मोफत नोंदणी करेल आणि सात दिवसांच्या आता मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रमाणपत्र देईल. रजिस्ट्रारच्या कामाबाबत कोणाला तक्रार करायची असेल तर 30 दिवसांच्या आत अपील करता येणार आहे. ही अपील केल्यानंतर त्यावर 90 दिवसांच्या आत रजिस्ट्रारला उत्तर द्यावं लागणार आहे.

याचा काय होणार फायदा?
मृत्यू आणि जन्म नोंदी थेट मतदार यादीशी जोडल्या जातील. याचा फायदा म्हणजे एखादी व्यक्ती 18 वर्षांची झाल्यावर त्याचं नाव आपोआप मतदार यादीत समाविष्ट होईल. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचते. त्यानंतर त्याचे नाव यादीतून आपोआप काढून टाकलं जाईल.

Share This News

Related Post

accident

देवीच्या दर्शनाहून परतत असताना कुटुंबावर काळाचा घाला; 4 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - May 4, 2023 0
सांगली : आज सकाळी सांगलीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. विटा नेवरी रोडवर हा भीषण अपघात झाला. हा…

चांदिवाल आयोगाची देशमुखांना क्लिनचिट ? 100 कोटींच्या वसुलीचे आरोप खोटे

Posted by - April 26, 2022 0
मुंबई – चांदीवाल आयोगाकडून अनिल देशमुख यांना क्लीनचिट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…
Weather Forecast

Weather Forecast : मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला रेड अलर्ट

Posted by - July 21, 2023 0
पुणे : रायगड जिल्ह्यात काल दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल्याची घटना घडलेली असतानाच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (Weather…

मोठी बातमी : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्क हवाई हल्ला ? मुंबई पोलीस सतर्क…

Posted by - January 25, 2023 0
मुंबई : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २६ जानेवारी रोजी शिवाजी पार्कवर परेड होणार आहे. 26 जानेवारीची ही विशेष परेड मुंबईकरांसाठी आकर्षणाचा…

महत्वाची बातमी ! शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दिली माहिती

Posted by - June 22, 2022 0
मुंबई- शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवे ट्विट करून शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी आमदार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *