Pankaja Munde

Pankaja Munde : मी बुद्धाचा नाहीतर कृष्णाचा मार्ग अवलंबलाय; पंकजा मुंडेंचे वक्तव्य

512 0

बीड : पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची शिवशक्ती यात्रा बीड जिल्ह्यामध्ये पोहोचली आहे. बीडच्या पाटोदा या ठिकाणी मुंडे यांच्या यात्रेचं आगमन झालं आहे. त्यांच्या या यात्रेला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पाटोद्यामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पंकजा मुंडे यांचे स्वागत केलं. त्यांच्या स्वागतासाठी फुलाची उधळण देखील करण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी आता बुद्धाचा मार्ग नाही तर श्रीकृष्णाचा मार्ग अवलंबल्याचे वक्तव्य केले.

नेमक्या काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
चार वर्षाच्या काळात मी फक्त राजकीय दुःखच नाही तर खूप काही सहन केलं आहे. पण माझी नीतिमत्ता एवढी लेचीपेची नाही. सर्व काही सहन करत असताना मी माझं धैर्य ढळू दिलं नाही, मी सत्य आणि तत्वाचं राजकारण करत असल्याचं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. सध्या महाराष्ट्रात माझ्याकडे कुठलीच जबाबदारी नाही, पण आता मी रखरखत्यां रनात उतरल्याचे मुंडे म्हणाल्या. मी आता बुद्धाच्या मार्गावर नाही तर आता मी श्रीकृष्णाचा मार्ग अवलंबला आहे. आता फक्त कर्म करायचे आहे. त्यामुळं मला फळाची कुठलीही अपेक्षा नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यापुढं जे काही करायचं ते जनतेसाठी करायचं. कारण जनताच माझं कर्म आणि माझा धर्म असल्याचे मुंडे म्हणाल्या.

मुंडे साहेबांच्या नावाशिवाय आता माझी क्षमता मला सिद्ध करायचीय
मुंडेसाहेब आता आपल्यामध्ये नाहीत. त्यामुळं कदाचित त्यांनी जर मला विचारलं की माझ्याशिवाय तू काय केलंस, त्यामुळे आता मुंडे साहेबांच्या नावाशिवाय मला माझी क्षमता सिद्ध करुन दाखवायची असल्याचे मुंडे म्हणाल्या. मला माझं कर्तृत्व सिद्ध करून काहीही मिळवायचे नाही हे सगळं जनतेसाठी करत आहे. मी निवडणुकीत एकदा हरले तर त्याचा काही लोकांनी खूप मोठा इशू केला. निवडणुकीमध्ये हार आणि जीत होत असते. मुंडे साहेब देखील एकदा पराभूत झाले होते. माझा पराभव कसा झाला हे आता सर्वांनाच कळलं आहे असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

Share This News

Related Post

Suresh Kute

Suresh Kute : आयकर विभागाच्या कारवाईमुळे कुटे कुटुंबाचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - November 11, 2023 0
नागपूर : काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चेत आलेले आणि बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे (Suresh Kute) प्रमुख सुरेश कुटे आणि…
Solapur Fire

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Posted by - April 3, 2024 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Fire) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली आहे.एमआयडीसीतील…
Palghar News

Palghar News : धक्कादायक! क्रिकेट सामना बघताना वाद झाला अन् तरुण जीवानिशी मुकला

Posted by - December 2, 2023 0
पालघर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना बघताना झालेल्या वादामुळे एका तरुणाला आपला जीव (Palghar News)…

TOP NEWS SPECIAL: महाराष्ट्र केसरी किताबाचे आतापर्यंतचे ‘हे’ आहेत मानकरी ?

Posted by - January 15, 2023 0
राज्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली यात खेडच्या शिवराज राक्षे 2023 चा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला सध्या त्याचा…

भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर फक्त दोनच व्यक्तींच्या…. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिला गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा

Posted by - March 19, 2023 0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काही अठवणींना उजाळा दिला. आज नाशिक येथील सिन्नर तालुक्यात गोपीनाथ मुंडे पुर्णाकृती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *