Pune Metro Timetable Changed

Pune Metro Timetable Changed : पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात उद्यासाठी करण्यात आला ‘हा’ बदल

495 0

पुणे : पुणे मेट्रोमुळे पुणेकरांचा (Pune Metro Timetable Changed) प्रवास आता सुखकर होणार आहे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पुणे मेट्रोची प्रवाशांसाठी सेवा सुरू असते. पण काही तांत्रिक कारणास्तव उद्या पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.

“उद्या दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी (केवळ एक दिवसासाठी) काही तांत्रिक कारणामुळे दोन्ही मार्गिकांवरील प्रवासी सेवा सकाळी 7.00 वाजतापासून (एक तास उशिरा) सुरू होईल, ह्याची सर्व प्रवाश्यांनी नोंद घ्यावी.” असं ट्वीट पुणे मेट्रोकडून करण्यात आलं आहे.

लाईन 1 – पीसीएमसी ते सिव्हील कोर्ट मेट्रो स्थानक आणि लाईन 2 – वनाझ ते रूबी हॉल मेट्रो स्थानक या मार्गावर फक्त एका दिवसासाठी हा बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबद्दल पुणे मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. परवा म्हणजेच 11 सप्टेंबरपासून पुन्हा वेळापत्रक जशास तसे करण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

#PUNE : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; म्हणाले, ” माझ्याच घरात वाटले पैसे…!”

Posted by - February 27, 2023 0
पुणे : काल पुण्यात कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूक पार पडली. ही पोट निवडणूक होण्याआधी आणि पार पडल्यानंतर देखील आरोप प्रत्यारोप…

तेच-तेच टोमणे आणि तोंडाची वाफ !; पुण्याच्या माजी महापौरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Posted by - May 15, 2022 0
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी (ता.14) मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा घेत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. या…
Aishwarya Katta

Aishwarya Katta : ऐश्वर्य कट्टाकडून नवरात्री आणि द्वितीय वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवदुर्गांचा सन्मान

Posted by - October 18, 2023 0
पुणे : नवरात्रीचे दिवस नवरंगात न्हाऊन निघत असताना आजचा ऐश्वर्य कट्टाही (Aishwarya Katta) त्याला अपवाद नव्हता. सप्तरंगाची उधळण होत असताना…
Rikshaw

सहकार नगरमधील मुक्तांगण शाळेशेजारी रिक्षावर झाड कोसळले; महिलेचा मृत्यू

Posted by - June 12, 2023 0
पुणे : पुण्यातील सहकार नगर, मुक्तांगण शाळेशेजारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका रिक्षावर मोठे झाड कोसळल्यामुळे एका महिलेला…
Pune Porsche Accident Case

Pune Porsche Accident Case : अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - May 31, 2024 0
पुणे : राज्यभर गाजलेल्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Pune Porsche Accident Case) आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *