Nanded News

Nanded News : परभणीतील चिमुकल्याची नांदेडमध्ये क्रूरपणे हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का !

6076 0

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा नांदेडमध्ये खून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील तलावात शुक्रवारी या बालकाचा मृतदेह आढळून आला. त्याचे हात पाय बांधलेले होते. तसेच गळ्याला दोरी देखील बांधलेली होती. परमेश्वर प्रकाश बोबडे असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मृत परमेश्वर बोबडे हा बालक परभणी शहरातील कृषीसारथी येथील रहिवासी असून तो गुरुकुल निवासी शाळेत इयत्ता 9 वीमध्ये शिक्षण घेत होता. 7 सप्टेंबर रोजी पेपर देऊन तो गुरुकुलकडे जात होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्याचे अपहरण केले. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस स्टेशन ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा मान्य केला.

त्यांनी आपल्या जबाबात सांगितले कि, मुलाचा मृतदेह लोहा तालुक्यातील माळाकोळी जवळील माळेगावच्या तलावात हात पाय बांधून फेकण्यात आला. यानंतर परभणीच्या नवीन मोंढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आर.टी. नांदगावकर, पोलीस अंमलदार नागनाथ मुंडे आणि पंकज उगले हे नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी माळाकोळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार आणि इतर कर्मचाऱ्यासोबत घटनास्थळी पोहचले. मुलाचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. आरोपींनी 50 लाख रुपयाची खंडणी मागितली, अशी प्राथमिक माहिती आहे. खंडणी न दिल्यानेच त्या निरागस बालकाचा एवढ्या क्रूरतेने हत्या केल्याचे समोर आले आहे. परभणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेने नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.

Share This News

Related Post

पाटस टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसूली; 4 जणांवर गुन्हा दाखल

Posted by - July 9, 2022 0
पाटस येथील टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून नियमबाह्य टोल वसूल करून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मॅनेजरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात…

धक्कादायक बातमी : बेपत्ता झालेल्या वकिलाचा मृतदेह आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेत; परिसरात खळबळ

Posted by - January 2, 2023 0
पुणे : पुण्यात नवीन वर्षाची सुरुवातच धक्कादायक अपराधांनी घडते आहे. पिंपरी चिंचवड मधून देखील एक धक्कादायक वृत्त समोर येते आहे.…
Pune News

Pune News : पुण्यामध्ये टेम्पो आणि कारचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Posted by - September 4, 2023 0
पुणे : पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये (Pune News) अपघाताची एक घटना समोर आली आहे. यामध्ये तळेगाव ढमढेरे येथे टेम्पो आणि कारच्या…
Jalgaon News

Jalgaon News : दांडियात चॉकलेट वाटप केल्यानंतर तरुणाने घरी येऊन उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल; कुटूंब हादरलं

Posted by - October 22, 2023 0
जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *