Arun Sinha Pass Away

Arun Sinha Pass Away : पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन

2124 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे व स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे (Arun Sinha Pass Away) बुधवारी निधन झाले आहे. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अरुण कुमार सिन्हा हे 1987 बॅचचे आयपीसी अधिकारी होते. सिन्हा यांना निवृत्तीच्या एक दिवस आधीच एक वर्षांसाठी सेवावाढ मिळाली होती.

अरुण कुमार सिन्हा हे 2016पासून एसपीजी चीफ म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षीच त्यांना संचालक म्हणून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे आहे. अरुण कुमार सिन्हा, 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी, केरळचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (विशेष सेवा आणि वाहतूक) होते.अरुण सिन्हा, ज्यांना सुरक्षा प्रोटोकॉल आणि कायद्याच्या गुंतागुंतीची सखोल माहिती होती. त्यांनी देशभरातील विविध पोलिस दलांमधून निवडलेल्या सुमारे 3,000 च्या क्रॅक कमांडो टीमचे नेतृत्व केले होते. अरुण सिन्हा यांच्या पाश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

अनेक पदांनी गौरवण्यात आले
सिन्हा यांनी राज्यात क्राइम स्टॉपर यंत्रणेचा पाया रचला होता. त्यांच्या या प्रशंसनीय कार्यासाठी त्यांना अनेक पदके आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

Share This News

Related Post

बाईक टॅक्सी विरोधात देशव्यापी लढा उभारणार! देशभरातील रिक्षा संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद

Posted by - December 3, 2022 0
पुणे : आज देशभरातील रिक्षा संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन बाईक टॅक्सी विरोधात देशव्यापी लढा उभारणार असल्याची घोषणा केली आहे.…
accident

मध्यप्रदेशमध्ये पुलावरून बस कोसळून भीषण दुर्घटना; 15 जणांचा मृत्यू

Posted by - May 9, 2023 0
मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – आज सकाळी मध्यप्रदेश खरगोन या ठिकाणी आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये एक बस…

मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांसोबत… जितेंद्र आव्हाडांनी दिला ‘त्या’ आठवणींना उजाळा

Posted by - February 5, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला असून यामध्ये आपण मरेपर्यंत शरद पवार…

नाही..नाही..म्हणता ..म्हणता..! अब्दुल सत्तारांच्या गळ्यात पडली मंत्रिपदाची माळ, ‘या’ कारणाने शिंदे-भाजप सरकारकडून अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद?

Posted by - August 9, 2022 0
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील TET SCAM  मधील संबंध उघड झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या मंत्रिपदावर हात आया मुह ना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *