Shravan Giri Pass Away

Shravan Giri Pass Away : ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध निवेदक प्राध्यापक श्रावण गिरी यांचं निधन

1988 0

बीड : ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचे अपघाती निधन (Shravan Giri Pass Away) झाले आहे. बीडमध्ये रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन गिरी यांचा मृत्यू झाला. श्रावण गिरी हे कर्जत येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला गेले होते. काम आटोपून कर्जतला परतत असताना त्यांचा अपघात झाला. बीडमध्ये ट्रॅव्हल्स खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सपना ट्रॅव्हल्सनं त्यांना धडक दिल्यानं हा अपघात झाला.

रविवारी संध्याकाळी औरंगाबाद वरून कर्जतला जाण्यासाठी ते बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले होते. तिथून ट्रॅव्हल्सने जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत असताना सपना ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांच्या पायावरून गाडी गेल्याने ते खाली पडले. चौकात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शी तरुणांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे गिरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Related Post

Thane News

Thane News : धक्कादायक! ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू

Posted by - August 13, 2023 0
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या (Thane News) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका रात्रीत 17…
Chandrayaan-3

Chandrayaan-3 : चांद्रयान -3 बरोबर इस्त्रो आणखी ‘या’ 5 मोहिमांवर करत आहे काम

Posted by - July 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 3 ची (Chandrayaan-3) रंगीत तालीम इस्त्रोने यशस्वी केली आहे. आता केवळ…
Hasan Mushrif

हसन मुश्रीफ यांना मुंबई न्यायालयाचा दणका ! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Posted by - April 11, 2023 0
राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यामागे सध्या सध्या ईडीचा ससेमिरा लागला आहे. मुश्रीफ यांनी अटकेपासून…
Crime

पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांची ती सामूहिक आत्महत्या नव्हतीच; समोर आलं धक्कादायक सत्य 

Posted by - January 15, 2023 0
पुण्यातील मुंढवा भागात घडलेल्या सामूहिक आत्महत्येला वेगळं वळण आलंय. ती घटना सामूहिक आत्महत्या नसून शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यानं इंजिनिअर मुलानंच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *