Aditya-L1 Solar Mission

Aditya-L1 Solar Mission: चंद्रानंतर आता सूर्याची बारी; कुठे पहाल Aditya-L1 चं थेट प्रक्षेपण?

790 0

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोच्या (ISRO) आज पहिल्या सूर्य मोहिमेचा शुभारंभ (Aditya-L1 Solar Mission) होणार आहे. आदित्य एल1 (Aditya L1) हे यान शनिवार (2 सप्टेंबर) रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा (Sriharikota) सतीश धवन अवकाश केंद्रातून या ग्रहाचे प्रक्षेपण (Aditya-L1 Solar Mission) करण्यात येणार आहे. पीएसएलव्ही (PSLV) रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल1 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

कुठे पहाणार मिशन आदित्यचं थेट प्रक्षेपण?
आदित्य एल1 च्या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण हे इस्रोच्या अधिकृत बेवसाईटवर करण्यात येणार आहे. तसेच तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून देखील थेट प्रक्षेपण पाहू शकता. डीडी वाहिनीवर देखील या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सकाळी 11.20 मिनिटांनी या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

 

पाच टप्प्यात पूर्ण होणार सूर्याचा प्रवास
आदित्य एल1 हे पाच टप्प्यात सूर्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहे. या प्रवासासाठी जवळपास 125 दिवसांचा कालावधी लागेल. पहिल्या टप्प्यात पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल 1 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या कक्षेत विस्तारले जाईल. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण प्रभावाच्या बाहेर हे यान तिसऱ्या टप्प्यात काढले जाईल. चौथ्या टप्प्यात हे यान सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु करेल. तर पाचव्या टप्प्यात एल1 पाईंटवर पोहोचणार आहे.

Share This News

Related Post

Chandrayaan-3

Chandrayaan-3 : चांद्रयान -3 बरोबर इस्त्रो आणखी ‘या’ 5 मोहिमांवर करत आहे काम

Posted by - July 13, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान – 3 ची (Chandrayaan-3) रंगीत तालीम इस्त्रोने यशस्वी केली आहे. आता केवळ…
Japan Earthquake

Japan Earthquake : जपान हादरलं ! भूकंपाचे एकापाठोपाठ 21 धक्के; थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर

Posted by - January 1, 2024 0
टोकियो : वृत्तसंस्था – जपानला पुन्हा एकदा भूकंपाचा (Japan Earthquake) मोठा धक्का बसला. जपान हवामान विज्ञान एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम…

अमूलने वाहिली बप्पी लाहिरी यांना श्रद्धांजली

Posted by - February 17, 2022 0
  गोल्डन मॅन अशी ओळख असलेले ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले आहे. https://www.instagram.com/p/CaCpJDSvJD0/?utm_source=ig_web_button_share_sheet राजकीय, सामाजिक, बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रातून…
Uttarakhand

Uttarkashi Tunnel Rescue : उत्तरकाशीमधील मजूरांच्या सुटकेसाठी ‘या’ प्रकारे बनवला जात आहे बोगदा; Video व्हायरल

Posted by - November 24, 2023 0
उत्तराखंड : उत्तरकाशी येथील बोगद्यात (Uttarkashi Tunnel Rescue) अडकलेल्या मजूरांच्या सुटकेसाठी सरकारकडून दिवस-रात्र एक करुन प्रयत्न केले जात आहेत. तब्बल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *