India Aaghadi

India Aghadi : इंडिया आघाडीची आज मुंबईत बैठक; ‘या’ महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा

470 0

मुंबई : आज मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची (India Aghadi) बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये (India Aghadi) 28 पक्षांचे जवळ जवळ 63 नेते असण्याची शक्यता आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. देशभरात केंद्रातील मोदी सरकार विरोधात विरोधक एकजूट बनवत असून त्याच अनुषंगाने इंडिया ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे या इंडिया आघाडीची पहिली बैठक बिहारची राजधानी पाटणा शहरात पार पडली तर दुसरी बैठक ही बंगळुरू शहरांमध्ये संपन्न झाली त्यानंतर आता तिसरी बैठक मुंबईत होत असून या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं या बैठकीत इंडियाचे संयोजक नेमले जाण्याची शक्यता असून अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते नेमके कोणते निर्णय या इंडिया आघाडीच्या बैठकीत होऊ शकतात याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

संयोजकांची नियुक्ती: इंडिया आघाडीमध्ये योग्य समन्वय राहावा यासाठी अकरा संयोजकांची नियुक्ती या बैठकीत केली जाणारी शक्यता आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला: इंडिया आघाडीच्या या बैठकीत विरोधकांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानपदाचा चेहरा: दोन दिवसीय होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत विरोधकांकडून आपला पंतप्रधान पदाचा चेहरा देखील घोषित करण्याची शक्यता असून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची नावं ही चर्चेत असून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं नाव देखील विरोधकांकडून सुचवलं जाण्याची शक्यता आहे. एकंदरीतच काय तर इंडिया आघाडीच्या या बैठकीत नेमके कोणते महत्त्वपूर्ण निर्णय होणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Share This News

Related Post

Parbhani News

पुण्यात चक्क वाहतूक पोलीस अधिकारी महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर

Posted by - July 6, 2024 0
पुण्यात चक्क वाहतूक पोलीस अधिकारी महिलेला पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर पुण्यातून एक धक्कादायक बातमी…

खारघर येथील सदोष मनुष्यवधप्रकरणी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा

Posted by - April 19, 2023 0
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता…
DK Shivkumar

Rich MLA : देशातील श्रीमंत आमदारांची यादी जाहीर; डी. के शिवकुमार ठरले सर्वात श्रीमंत आमदार

Posted by - July 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील सर्वात श्रीमंत आमदारांची (Rich MLA) यादी प्रसिद्ध झाली असून या यादीनुसार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.…
Nilesh Lanke

Nilesh Lanke : उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का ! निलेश लंकेंची पुन्हा घरवापसी

Posted by - March 14, 2024 0
पुणे : आज पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील कार्यालयात दाखल झाले आहेत.…

Municipal elections : अखेर 4 सदस्यांचाचं प्रभाग निश्चित ; 2017 प्रमाणे होणार निवडणूक (VIDEO)

Posted by - August 3, 2022 0
Municipal elections : पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील तब्बल 18 महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत . या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आता 2017 नुसारच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *