Yavatmal News

Yavatmal News : दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं ! सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह

671 0

यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. या घटनेमुळे (Yavatmal News) संपूर्ण यवतमाळ हादरलं आहे. यवतमाळच्या खानगाव शिवारातील सज्जनगड मठाचे प्रमुख लक्ष्मण शेंडे उर्फ चरणदास महाराज आणि त्यांच्या सेवेकरी पुष्पा होले यांचे मृतदेह मठात आढळले आहेत. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय घडले नेमके?
या दोघांचे मृतदेह ते वास्तव्यास असलेल्या ठिकाणी आढळून आले आहेत. तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत आढळले होते. तसंच, दोघांच्या मृतदेहावर कोणत्याही मारहाणीच्या खुणा आढळल्या नसल्याने या प्रकरणाचे गुढ अधिक वाढले आहे. तसंच, संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने पोलिसही चक्रावले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून दोघेही मठात वास्तव्यास होते.

चरणदास महाराज हे जडीबुटी देऊन आजारी व्यक्तींवर उपचार करत होते. त्यांच्या उपचारांमुळं अनेकांना गुण आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवणारे आणि त्यांना मानणारे अनेक जण होते. त्यामुळं त्यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. हि हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. श्वान पथक, ठसेतज्ज्ञ आदींना पाचारण करुन या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Share This News

Related Post

Satara Crime

धावत्या कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात साताऱ्यातील युवा उद्योजकाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 21, 2023 0
सातारा : पुणे – बंगळूर आशियाई महामार्गावर (Pune – Bangalore Asian Highway) शनिवारी आटके टप्पा या ठिकाणी एका स्विफ्ट कारचा…

पीडितेने कोर्टासमोर ‘इन कॅमेरा’ दिलेली माहिती खोटी होती का ? चित्रा वाघ यांचा सवाल(व्हिडिओ)

Posted by - April 12, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेनं खळबळजन खुलासा केल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण…
Chandrashekhar Azad Ravan

Chandrashekhar Azad Ravan : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर जीवघेणा हल्ला

Posted by - June 28, 2023 0
लखनऊ : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या (Chandrashekhar Azad Ravan) गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे . उत्तर…

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी : वाहनचोरीत महाराष्ट्र 3 ऱ्या स्थानावर ; चोरीची नवी पद्धत , ‘मास्टर चावी’चा वापर करून..

Posted by - August 1, 2022 0
मुंबई : राज्यात गेल्या काही वर्षांपासून वाहनचोरीच्या घटनांत वाढ झाली असून चोरीच्या वाहनांची २४ तासांत विल्हेवाट लावणाऱ्या टोळय़ाही सक्रिय आहेत.…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मिळणार सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता

Posted by - May 10, 2022 0
मुंबई – कोरोनामुळे वर्षभर प्रलंबित ठेवण्यात आलेला सातव्या वेतन आयोगाच्या वेतन फरकाच्या थकबाकीचा तिसरा हप्ता राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *