Jalgaon Crime

Jalgaon Crime : चिमुरड्याचा आक्रोश ऐकून घरात प्रवेश केला अन् समोरचे दृष्य पाहून सर्वच हादरले

30324 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Crime) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. खानदेशचे (Jalgaon Crime) ग्रामदैवत असलेल्या कानुमातेच्या उत्सवासाठी आपल्या गावी गंगापूर येथे आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. यामध्ये विद्युत वजन काट्याचा शॉक लागून एका विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना रविवारी दुपारी धरणगाव शहरात घडली आहे. भारती घनश्याम पाटील (रा. गंगापुरी ता. धरणगाव), असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.

काय घडले नेमके?
घनश्याम रायभान पाटील हे आपली पत्नी 4 वर्षाची मुलगी आणि 10 वर्षाच्या मुलासह सुरत येथे वास्तव्यास आहेत. कानबाईच्या उत्सवासाठी ते आपल्या परिवारासह गावी आले होते. रविवारी सकाळी ते आई-वडिलांसोबत शेतात भेंडी तोडायला गेले होते. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घरात भारतीबाई यांच्या लहान मुलांनी रडत-रडत आरडा ओरडा करायला सुरुवात केली. मावशी, काकू आमची आई बेशुद्ध पडलीय, लवकर या. मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या संगिता संजय पाटील यांनी घरात जाऊन पाहिले असता भारती पाटील ह्या जमिनीवर पडलेल्या होत्या.

यावेळी भारती पाटील यांच्या हातात ईलेक्ट्रीक वजन काट्याची ईलेक्ट्रीक पिन होती. विजेच्या धक्क्यामुळे भारती पाटील ह्या बेशुद्ध पडल्याचे लक्षात आले. गावकऱ्यांनी मिळून भारती पाटील यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी धरणगाव पोलिंसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर शिंदे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Fraud

Fraud News : लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तरुणांना 29 लाखांचा गंडा

Posted by - June 23, 2023 0
पुणे : पुण्यामधून फसवणुकीचे (Fraud News) एक मोठे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये लष्करी गणवेश घालून मोठ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे…

7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; मोदी सरकारचे नवीन आदेश

Posted by - October 31, 2022 0
नवी दिल्ली : सरकारने काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. अशातच आता केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन आदेश…

पुण्याचे पोलिस सहआयुक्त रवींद्र शिसवे यांची बदली; संदीप कर्णिक पुण्याचे पोलीस सहआयुक्त

Posted by - April 20, 2022 0
पुण्याचे पोलीस सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली…

शरद पवार यांनी नकार दिल्यास राष्ट्रपतीपदासाठी राजकीय परिघाबाहेरील उमेदवार निवडावा, शिवसेनेची भूमिका

Posted by - June 15, 2022 0
नवी दिल्ली- केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद…
Loksabha 2024

Loksabha 2024: महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात यंदा तब्बल 250+ उमेदवार?

Posted by - March 2, 2024 0
मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या (Loksabha 2024) पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *