सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत महत्त्वाची – सत्र न्यायधीश संजय देशमुख

316 0

पुणे- लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा अग्रेसर असून सामंजस्याने वाद मिटविण्यासाठी लोक अदालत अत्यंत महत्त्वाची ठरते, जिल्ह्यात लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश तथा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी व्यक्त केला.

जिल्हा व सत्र न्यायालयात आज राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा न्यायधीश एस.एस.गोसावी, जिल्हा न्यायधीश के.पी.नांदेडकर, न्यायधीश वेदपाठक, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर प्रताप सावंत, जिल्हा सरकारी वकील एन.डी.पाटील, पुणे वकील बार आसोसियशनचे अध्यक्ष ॲड. पांडुरंग थोरवे, न्यायाधीश, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, “लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे. मतभेद असू शकतात पण मनभेद नसावेत. भविष्याचा विचार करून कोर्टात वेळ व पैसा न घालवता वाद सामंजस्याने मिटवावे असा सल्ला त्यांनी दिला. तसेच लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा आपले अग्रेसर स्थान कायम ठेवेल” असेही ते म्हणाले.

नांदेडकर म्हणाले, “लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणांचा निपटारा गतीने करू शकल्यामुळे लोक अदालतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. गतवर्षी लोक अदालतीमध्ये पुणे जिल्ह्याने देशात यश मिळवले. आजच्या लोक अदालतीच्या यशाचीही नोंद होईल. आजच्या लोक अदालतीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकरणे निकाली कसे निघतील यासाठी प्रयत्न करावे” असे आवाहनही त्यांनी केले.

सावंत म्हणाले, “लोक अदालतीमध्ये पुणे येथील ५० हजारापेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे, दाखलपूर्व २ लाखापेक्षा अधिक, ई-चलन ११ लाखापेक्षा अधिक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुण्यात ६० पॅनल उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ७ ते ११ मार्च या कालावधीत छोट्या गुन्ह्यातील १७ हजारापेक्षा अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुणे जिल्हा लोक अदालतीची दखल जागतिक बँकेने व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने घेतली असून याबाबत एकत्रित अभ्यास करून डाटा संकलनाचे काम सुरू आहे. विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी याबाबतचे काम करत आहेत”

 

Share This News

Related Post

Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहोळची गेम गॅंगमधील ‘त्या’ साथीदाराने केली; कोण आहे ‘तो’ व्यक्ती?

Posted by - January 5, 2024 0
पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची पुण्यात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली आहे. दुपारी सव्वाएकच्या सुमारास शरद मोहोळ…

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा, आमदार महेश लांडगे यांनी दिली माहिती

Posted by - April 15, 2022 0
पिंपरी- भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती आता सुधारत असून लवकरच जगताप कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील अशी माहिती भोसरीचे आमदार…
Book Publication

डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन; ‘पोएम म्हंजी काय रं?’ पुस्तकाचे प्रकाशन

Posted by - May 7, 2023 0
पुणे : ‘पुस्तकाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट समोर आणता किंवा समाजमाध्यमांवर जेव्हा लिहिता, तेव्हा त्याची नैतिक जबाबदारी…

शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी, प्रशांत जगताप यांची मागणी

Posted by - February 12, 2022 0
पुणे- यंदा शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी मिरवणुकीला परवानगी द्यावी अशी विनंती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार…
dheeraj-ghate

Pune News : जिंकण्यासाठी षडयंत्र रचणे हेच काँग्रेसचे चरित्र, भाजपच्या विजयासाठी मतदारच उत्सुक : धीरज घाटे

Posted by - April 20, 2024 0
पुणे : भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, 300 पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *