Chandrayaan-3

Chandrayaan-3 : प्रक्षेपणापासून लँडिंगपर्यंतचा चांद्रयान-3 चा 40 दिवसांचा प्रवास कसा होता?

1488 0

मुंबई : अवघ्या काही तासांत भारत एक नवा इतिहास रचणार आहे. इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. यामध्ये यश मिळाल्यास भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या मोहिमेकडे लागून राहिले आहे. चांद्रयान-3 ला अवकाशात झेपावून 40 दिवस झाले आहेत. या दिवसांमध्ये चांद्रयान-3 चा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया…

चांद्रयान-3 चा 40 दिवसांचा प्रवास कसा होता?
5 जुलै : चांद्रयान-3 ला अंतराळात नेणाऱ्या LVM-3 रॉकेटशी जोडण्यात आलं. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात प्रक्षेपणाची तयारी सुरू झाली.
6 जुलै : इस्रो (ISRO) ने मिशन चांद्रयान-3 चं प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली.
11 जुलै : चांद्रयान-3 ची ‘लाँच रिहर्सल’ करण्यात आली. इस्रोकडून चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण करण्यात आली.
14 जुलै : लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-3) म्हणजेच ‘बाहुबली रॉकेट’ (Bahubali Rocket) द्वारे चांद्रयान-3 चं श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून 2.35 वाजता यशस्वी प्रक्षेपण पार पडलं.
15 जुलै : LVM 3-M4 रॉकेटने चांद्रयान-3 योग्य कक्षेत पोहोचवलं. चांद्रयान-3 ने 41762 किमी x 173 किमीची कक्षा गाठली. चांद्रयान-3 ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला.
17 जुलै : चांद्रयान-3 41603 किमी x 226 किमीच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचलं.
22 जुलै : चांद्रयान-3 ने चौथ्या कक्षेत प्रवेश केला. अंतराळयान 71351 किमी x 233 किमीच्या कक्षेत पोहोचलं.
25 जुलै : चांद्रयान-3 ला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी बुस्टिंग करण्यात आलं. निर्धारित वेळेत चांद्रयान-3 चं इंजिन चालू करण्यात आले. त्यानंतर या यानाला पुरेसा वेग देऊन त्याला चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आलं.
1 ऑगस्ट : चांद्रयान-3 ट्रान्सलुनर कक्षेत (288 किमी x 369328 किमी) पोहोचलं.
5 ऑगस्ट : चांद्रयान-3 ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत (164 किमी x 18074 किमी) प्रवेश केला.
6 ऑगस्ट : अखेर चंद्राचं दर्शन झालं! चांद्रयान-3 यानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला.
6 ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत दाखल झालं. 6 ऑगस्ट 2023 रोजी यान 170 x 4313 किमी कक्षेत पोहोचलं.
9 ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं. चांद्रयान-3 ने 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.40 वाजता कक्षा बदलली.
10 ऑगस्ट : चांद्रयान-3 ने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो पाठवले.
14 ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागाजवळ पोहोचलं. यानाने 150 किमी x 177 किमीवर चौथ्या कक्षेत प्रवेश केला.
16 ऑगस्ट : अंतराळयानाने 163 किमी x 153 किमीची चंद्राची पाचवी आणि अंतिम कक्षा गाठली.
17 ऑगस्ट : चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं आहे.
18 ऑगस्ट : चांद्रयान3 चंद्राच्या 113 किमी x 157 किमी कक्षेत पोहोचलं. विक्रम लँडरचा वेग कमी करण्याची डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. चांद्रयान-3 चंद्रापासून 30 किमी अंतरावर पोहोचलं.
20 ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या 134 किमी x 25 किमी कक्षेत पोहोचण्यासाठी डिबूस्टिंग प्रक्रियेद्रवारे विक्रम लँडरचा वेग पुन्हा कमी करण्यात आला आणि चांद्रयान-3 चंद्रापासून 25 किमी अंतरावर पोहोचलं.
21 ऑगस्ट : चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 चा एकमेकांशी संपर्क झाला. इस्रोची चांद्रयान-2 मोहिम अयशस्वी ठरली तरी, चांद्रयान-2 चं ऑर्बिटर अद्यापही अवकाशात चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे.
23 ऑगस्ट : चांद्रयान-3 चा वेग आता हळूहळू कमी होत आहे. चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करेल.

Share This News

Related Post

जागतिक पर्यावरण दिवस ! इतिहास, महत्व आणि 2022 ची थीम जाणून घ्या

Posted by - June 5, 2022 0
5 जून या दिवशी असणारा दिन म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिन संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.…

CM EKNATH SHINDE : दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाच्यावतीनं मुंबई महापालिकेकडं अर्ज

Posted by - September 2, 2022 0
मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून शिवाजी पार्कवरती होणाऱ्या दसरा मेळाव्याची चर्चा होती. दसऱ्याच्या दिवशी नक्की शिवसेनेचा मेळावा होणार की एकनाथ…

शिवसेनेला मोठा धक्का! राष्ट्रवादीवर आरोप करत ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा

Posted by - June 26, 2022 0
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा…

नाशिक मधील ‘त्या’ हत्याकांडाचा आज निकाल लागला; न्यायालयाने आरोपींना सुनावली मरेपर्यंत फाशी

Posted by - December 16, 2022 0
नाशिक : नाशिक मधील विपिन बाफना हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना नाशिक न्यायालयाने दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2013…

जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात झाले 29 हजार अपघात; नवीन वर्ष अपघात मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प

Posted by - December 31, 2022 0
पुणे : आगामी नूतन वर्षाचे स्वागत करताना महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मानसोपचार तज्ञ यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *