extra-marital-affair

Extra Marital Affair : ‘या’ कारणामुळे लग्नानंतरही परपुरुषाशी जवळीक साधतात महिला

495 0

हिंदू धर्मामध्ये वैवाहिक नात्याला (Extra Marital Affair) एक वेगळं महत्त्व असतं. प्रेम आणि विश्वास या दोन्हींच्या गोष्टींवर वैवाहिक नातं (Extra Marital Affair) टिकून राहतं. या दोघांपैकी एकाचीही कमतरता असेल तर नातं तुटायला वेळ लागत नाही. मात्र ज्यावेळी जोडीदाराकडून प्रेम मिळत नाही त्यावेळी तेव्हा लोक नात्याबाहेर आनंद शोधू लागतात. केवळ पुरुषच नाही तर महिलाही मोठ्या प्रमाणात एक्स्ट्रा मॅरीटल अफेयर ( Extra Marital Affair ) म्हणजेच विवाहबाह्य संबंधांकडे वळू लागल्या आहेत. मात्र अशी कोणती कारणं आहेत, ज्यामुळे महिला जोडीदार असून देखील दुसऱ्या जोडीदाराच्या शोधात असतात? चला तर मग ही कारणे जाणून घेवुयात…

एक्स्ट्रा मॅरीटल अफेयर होण्याचं कारण पुढीलप्रमाणे-
इमोशनल सपोर्ट न मिळणं
एका संशोधनानुसार, 28 टक्के महिलांचं एक्स्ट्रा मॅरीटल अफेयर असण्यामागे कारण असतं ते म्हणजे इमोशनल सपोर्ट. ज्यावेळी जोडीदाराकडून इमोशनल सपोर्ट मिळत नाही तेव्हा महिला दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतात.

स्वभावात होणारे बदल
एका संशोधनातून असं समोर आलंय की, पतीच्या स्वभावात कालांतराने बदल झाले तर महिला दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होण्याची शक्यता अधिक असते. लग्नानंतर काही काळाने पती घर आणि मुलं यांच्या जबाबदारीमध्ये अडकतो. अशावेळी तो पहिल्याप्रमाणे रोमँटीक राहत नाही. यावेळी पत्नीला पुरेसा वेळ देता येत नसल्याने महिलांकडून चुकीचं पाऊल उचललं जातं.

शरीर सुखाची कमतरता
एका संशोधनानुसार, वयाच्या चाळीशीनंतर देखील महिला एक्स्ट्रा मॅरीटल अफेयर ठेवत असल्याचं समोर आलंय. याचं कारण म्हणजे, महिलेला पतीकडून सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. ज्यावेळी एखाद्या महिलेला जोडीदाराकडून अपेक्षेप्रमाणे शरीर सुख मिळत नाही, त्यावेळी ती दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होण्याची शक्यता जास्त असते.

घरातील भांडणं
कोणत्या घरात भांडणं होत नाहीत, मात्र अनेकदा या भांडणांचे परिणाम फार विचित्र असतात. अनेकदा महिलांकडून एक्स्ट्रा मॅरीटल अफेयर असण्यामागे कारण हे घरातील भांडण असू शकतं, हे रिसर्चमधून समोर आलंय. अनेकदा घरातील ताणतणावामुळे महिला त्रस्त होतात आणि घराबाहेर प्रेमाचा शोध घेऊ लागतात.

Share This News

Related Post

उन्हाळ्यात कशा प्रकारे घ्यावी स्वतःच्या आरोग्याची काळजी, जाणून घ्या..

Posted by - March 7, 2022 0
उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास, चक्कर येणे, डोके दुखणे, थकवा जाणवणं, पायात गोळा येणे, चिडचिड व राग…

वास्तू तथास्तु…! घरात अस्वस्थ वाटते आहे ? ‘या’ वास्तु टिप्स फॉलो करा , घराला येईल घरपण… 

Posted by - July 28, 2022 0
वास्तू तथास्तु…! घरामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाला वाटत असतं की , घराने आपल्याला आपलंसं करून घ्यावं.  अर्थात त्या घरामध्ये आपलेपणा वाटावा…

सॅमसंग मोबाईल प्रेमींसाठी लवकरच येणार एक नवीन खुशखबर

Posted by - February 8, 2022 0
मोबाईल प्रेमींसाठी एक आनंदवार्ता आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग 9 फेब्रुवारीला आपली नवी स्मार्टफोन सीरीज Samsung Galaxy S22 लाँच करणार…
Sex

Sex : बेडवर नाही तर ‘या’ ठिकाणी सेक्स करणं असू शकतं एक्सायटिंग

Posted by - August 4, 2023 0
सेक्स (Sex) ही दोन व्यक्तींमधील इंटीमसी असते आणि यात आपल्या जोडीदाराला सुख मिळावं अशी स्त्री-पुरुष दोघांचीही इच्छा असते. आज आपण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *