Sana Khan

Sana Khan Murder Case : सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण ‘ही’ माहिती आली समोर

600 0

नागपूर : भाजप अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात (Sana Khan Murder Case) रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. सना खान यांचा (Sana Khan Murder Case) मृतदेह मध्य प्रदेशातील सिहोरी ग्राम इथं नर्मदा नदीच्या पात्रात आढळून आला होता. या प्रकरणी आरोपी अमित शाहुला नागपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्याची सध्या कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

सना खान यांच्या हत्तेतील आरोपी अमित शाहू सेक्सटोर्शन रॅकेट चालवायचा, असे आता समोर आले आहे. तो श्रीमंत लोकांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. 35 वर्षीय महिलेच्या माध्यमातून धनदांडग्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तो ब्लॅकमेल करायचा. यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचा. अशाप्रकारे आरोपीने अनेक लोकांना लुबाडले आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये काही राजकीय व्यक्तीसुद्धा असल्याचे समोर आले आहे. अमित शाहू आणि त्याच्या साथीदारांविरोधात खंडणी, ब्लॅकमेल, गुन्हेगारी कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Akola News : रागावून माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्यामुळे पतीने उचलले ‘हे’ धक्कादायक पाऊल

काय आहे नेमके प्रकरण?
2 ऑगस्टपासून सना खान बेपत्ता होत्या. या प्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर याप्रकरणी आरोपी अमित शाहुला नागपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली. यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने सना खान यांची हत्या केल्याचे कबूल केले. अमितने पत्नी सना खानची हत्या ही पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचं समोर येतंय. अमित साहूने पत्नीकडून 50 लाख रुपये इतकी रक्कम पार्टनरशिपसाठी घेतली होती. सनाने हे पैसे परत मागितल्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि यातून सना खानची हत्या झाली असल्याचे समोर आले आहे.

Share This News

Related Post

Hingoli News

Hingoli News : पिकअप आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; बाईकचालकाचा जागीच मृत्यू

Posted by - December 5, 2023 0
हिंगोली : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. हिंगोलीमधील (Hingoli News) सेनगाव राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पिकअपचा आणि मोटारसायकलचा अपघात‌…

‘प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक ज्येष्ठ उद्योजक हुकमीचंद चोरडिया यांचं निधन

Posted by - June 3, 2022 0
पुणे- ‘प्रवीण मसालेवाले’ या लोकप्रिय ब्रँडचे संस्थापक सुप्रसिद्ध उद्योजक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (वय ९२) यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं.…
Ramchandra Avsare

भाजपचे माजी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांचे निधन

Posted by - June 3, 2023 0
भंडारा : राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भंडारा (Bhandara) विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे…
Thane Crime News

Thane Crime News : ठाणे हादरलं! भररस्त्यात तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - December 10, 2023 0
ठाणे : ठाणे (Thane Crime News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात…
cm eknath shinde

CM EKNATH SHINDE : वन्यजीवांच्या संवर्धनासोबतच ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी

Posted by - September 22, 2022 0
मुंबई : राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *