पुणे जिल्हा परिषदेवर 21 मार्च पासून प्रशासक येण्याची शक्यता ?

139 0

जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल येत्या २१ मार्च रोजी संपत आहे.

अद्याप गट आणि गणांची प्रारूप रचना अंतिम न झाल्याने तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यामुळे जिल्हा परिषदेवर २१ मार्चपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासक नेमले जाण्याची शक्यता आहे.

पुण्यासह राज्यातील २६ जिल्हा परिषदांचा कार्यकाल संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची प्रारूप रचना अद्याप तयार झालेली नाही.

त्यात नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, तारखा ठरवणे, प्रारूप रचना ठरवणे याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाला राज्य शासनाला विचारून घ्यावा लागणार आहे.

यामुळे गट व आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत गणांच्या पुनर्रचनेवर परिणाम होणार आहे.

या बाबींमुळे यंदा निवडणुका पडणार असल्याचे स्पष्ट संकेत असून, स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदेची आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट संकेत असून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक येण्याची शक्यता आहे.

  • जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकारी व सदस्यांची मुदत २१ मार्चला संपणार आहे. तर तेरा पंचायत समित्यांचा कार्यकाल १३ मार्चला संपत आहे 
  • मात्र अद्याप गट, गण रचना व त्यांची आरक्षण सोडत ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे २१ तारखेपासून जिल्हा परिषदेवर तर १४ मार्चपासून पंचायत समित्यांवर प्रशासन नेमला जाण्याची शक्यता आहे.

निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता….

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतचे अधिकार आता राज्य शासनाकडे आहेत.
या नव्या आदेशामुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना पुन्हा होण्याची शक्यता आहे. यासोबतच जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची प्रारुप रचनाही बदलण्याची शक्यता आहे. यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने निवडणुका लांबणीवर जाणार आहेत. यामुळे प्रशासकाच्या कालावधीतही वाढ होण्याची शक्यता आहे. किमान ३ ते ४ महिने प्रशासक राहण्याची शक्यता आहे.

Share This News

Related Post

Dasara Melava

Dasara Melava : अखेर ठरलं! ‘या’ मैदानावर होणार शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा

Posted by - October 16, 2023 0
मुंबई : दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क इथं दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा (Dasara Melava) पार पडतो. शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर शिवाजी…

बारसूतील रिफायनरीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध, रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची वाट

Posted by - April 25, 2023 0
राजापूर- रत्नागिरी जवळील बारसूमध्ये नियोजित रिफायनरी प्रकल्पाला (refinery protest)ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.…
Nanded Loksabha

Nanded Loksabha : नांदेडमधल्या मतदानाला लागलं गालबोट; तरुणाने थेट कुऱ्हाडीने EVM फोडलं

Posted by - April 26, 2024 0
नांदेड : आज देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या (Nanded Loksabha) दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. यामध्ये महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Posted by - July 23, 2022 0
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात टिळकांचे स्मरण हे कर्तव्य मुंबई : “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर…

Breaking News ! हरियाणामध्ये 4 संशयित दहशतवाद्यांना अटक, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

Posted by - May 5, 2022 0
कर्नाल- हरियाणातील कर्नाल येथून चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चौघांकडून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याकडे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *